भुसावळ : येथील माजी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
नेमकं काय आहे कारण?
तत्कालीन भाजपचे नगराध्यक्ष यांनी 17 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
याबाबत भाजप नगरसेविका पुष्पा बतरा यांनी 28 डिसेंबर 2021 रोजी सदर माजी नगराध्यक्ष व नगरसेविकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती.नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी याप्रकरणी अंतिम सुनावणी करत माजी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांना 6 वर्षासाठी केले निलंबित केल्याचे आदेश पारीत केले आहेत.
निलंबित झालेल्यांमध्ये पुढील सदस्यांचा समावेश आहे.-
रमण देविदास भोळे, अमोल इंगळे, लक्ष्मी रमेश मकासरे, प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे, मेघा देवेंद्र वाणी, बोधराज दगडू चौधरी, शोभा अरुण नेमाडे, किरण भागवत कोलते, शैलजा पुरुषोत्तम नारखेडे, पुष्पाताई रमेशलाल बतरा यांचा समावेश आहे.