जळगाव :- महाराष्ट्रात सध्या चैन स्नेचिंग प्रमाण वाढले असून बहीणीच्या मुलीच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत पॅडॉलसह वजन ३५ मत २५००० रुपये किमतीचे चेन स्नैचिंग करून जबरीने चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीना अखेर शनी[पेठ पोलिसांनी जेरबंद केले आहे.
सविस्तर असे की, २२/१५ वाजता अकोला जिल्हा सिव्हील लाईन पोलीस स्टेशन ४०७/२०२२ भादवि कलम ३९२३४ प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादीचे बहीणीच्या मुलीच्या वाढदिवसाकरीता हॉटेल सेंटर प्लाझा येथे गेले असता कार्यक्रम आटोपून परत जाणे करीता स्वाद बेकरी जवळ उभी असतांना दोन इसम बिगर नंबरचे मोटार सायकलवर येवून फिर्यादीचे गळ्यातील एक सोन्याची पट्टीदार पोत पॅडॉलसह वजन ३५ मत २५००० रुपये किमतीचे चेन स्नैचिंग करून जबरीने चोरून नेली बाबत वराप्रमाणे गुन्हा असून सदर गुन्हयातील आरोपी यांचा घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज वरुन शोध घेतला असता अकोला स्थानिक गुन्हे शाखा येथील नेमणुकीचे सपोनि / गोपाल ढोले यांनी शनिपेठ पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत सो यांना फोनव्दारे कळवून सदर गुन्हयाचे घटनास्थळाचे सी.सी.टी.व्ही. फुटेज पाठविले असता सदर फूटेज ची पाहणी करून शनिपेठ पो स्टे चे गुन्हे शोध पथकाती अंमलदार पोहेको १७९१ परोष जाधव, पोना / १५९८ विजय निकम, पोको १२२ अनिल कांबळे पोको ६७७ राहूल घेटे, पोको ४४४ राहूल पाटील अशांना त्यांचे कैबिनमधे बोलावुन सदर गुन्हयाबाबत माहीती देवून सदर सी.सी.टी.व्ही फूटेज मधील आरोपीताचा शोध घेणेकामी तात्काळ रवाना केले.
गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोकों / १२२ अनिल कांबळे व पोकों /६७७ राहूल घंटे यांनी त्याचे गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळवली की, आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी वय २६ रा प्रजापत नगर ममुराबाद रोड जळगाव हा कुसुंबा येथे असल्याचे समजल्याने सदर ठिकाणी शनिपेठ पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी लागलीच रवाना होवून सदर ठिकाणी जावुन सापळा रचून शिताफिन सी.सी.टी.व्ही. फुटेज मधील इसम हा आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी च असल्याची खात्री झाल्याने त्यास विश्वासात घेवून त्याने गुन्हयात सहभागी असल्याची कबुली दिल्याने त्यास गुन्हयाकामी ताब्यात घेतले.
पो.स्टला आणून मा.पो.नि.सो यांचे समक्ष हजर केले. त्यास गुन्हयाबाबत अधिक विचारपूस करता त्याने त्याचे दुसरा साथिदार दिपक रमेश शिरसाठ वय २६ रा. वरखेडी ता.पाचोरा जि.जळगाव व लोकेश महाजन रा. खेडी जळगाव अशांसह सदर ठिकाणी आम्ही सोनसाळखी जबरी चोरी केल्याचे तसेच अकोला जिल्हयातील एकूण ९ चैन स्नेचिंग करुन जबरी चोरी केल्याचे कबुली दिल्याने शनिपेठ पो. स्टे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार तसेच स्था.गु.शा जळगाव चे पोहेकी / २६१९ संजय हिवरकर तसेच पोहेको / १४९० राजेंद्र मैटे असे त्याचे साथिदार यांचा शोध घेणेकामी रवाना होवून दिपक रमेश शिरसाट यास कासमवाडी जळगाव येथुन बजाज पल्सर मो.सा.क्र.एम एच १४ के जी. ७१९९ सह ताब्यात घेवून पो स्टे ला हजर केले.
हे वाचलंत का ?
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.