धक्कादायक : लग्नानंतर प्रियकरासोबत पळून गेली, पाच वर्ष संसार, मग दोन चिमुरड्यांसह गर्भवती विहिरीत आढळली

Spread the love

Pregnant Lady: लक्ष्मीचा विवाह पाच वर्षांपूर्वी नात्यातील तरुणासोबत झाला होता. मात्र, त्यानंतर लक्ष्मीने धानेशा यांच्यासोबत पळून जाऊन प्रेम विवाह केला होता. या लग्नाला लक्ष्मीच्या घरच्यांनी विरोध केला होता. त्यानंतर लक्ष्मीच्या माहेरच्या नातेवाईकांनी लक्ष्मी सोबतचे असणारे सर्व संबंध तोडून टाकले होते.

सांगली :- सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जत तालुक्यातील सिंदूरमध्ये दोन मुलांसह गर्भवती आईचा विहिरीत मृतदेह सापडला आहे. यामध्ये एक वर्षाचा मुलगा आणि दोन वर्षाच्या मुलीचा समावेश असून आईने आपल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लक्ष्मी धानेशा माडग्याळ (वय २३), दिव्या धानेशा माडग्याळ (वय ०२) आणि श्रीशैल्य धानेशा माडग्याळ (वय ०१) अशी मृतांची नावं आहेत. शेतामध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये आपल्या दोन चिमुरड्यांसह गर्भवती असणाऱ्या मातेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा आहे. जत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीचा विवाह पाच वर्षांपूर्वी नात्यातील तरुणासोबत झाला होता. मात्र, त्यानंतर लक्ष्मीने धानेशा यांच्यासोबत पळून जाऊन प्रेम विवाह केला होता.

या लग्नाला लक्ष्मीच्या घरच्यांनी विरोध केला होता. त्यानंतर लक्ष्मीच्या माहेरच्या नातेवाईकांनी लक्ष्मी सोबतचे असणारे सर्व संबंध तोडून टाकले होते. गेल्या चार वर्षांपासून लक्ष्मी ही पती धानेशा माडग्याळ यांच्यासोबत सिंदूर गावापासून ३ किलोमीटर अंतरावर अढळहटी रोडवर असणाऱ्या कर्नाटक सीमेवर एका शेतात राहत होती. या दाम्पत्याला दोन वर्षाची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा होता. तर लक्ष्मी ही सध्या तीन महिन्याची गर्भवती होती.

दरम्यान, रविवारी सायंकाळी लक्ष्मी आपल्या मुलांसोबत गायब असल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांचा शोध घेतला असता ते तिघेही शेतातल्या विहिरीमध्ये मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर घटनास्थळी जत पोलिसांनी धाव घेत आईसह दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले.

दरम्यान, पळून गेल्यानंतर धानेशा आणि लक्ष्मी यांच्यामध्ये असणारे प्रेम प्रकरण मिटवण्यासाठी लक्ष्मीच्या आई-वडिलांनी धानेशाला पैसे दिले होते आणि या पैशांवरुन लक्ष्मी आणि धानेशा यांच्यामध्ये भांडण होत असतं. यामधूनच लक्ष्मीने आपल्या दोन्ही मुलांसह विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

तर ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत लक्ष्मीच्या माहेरच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. याप्रकरणी जत पोलिसांनी घटनेची नोंद करत ही आत्महत्या आहे की घातपात, या दृष्टीने तपास सुरू केला आहे.

.पिकाचे पैसे आले की मुलीच लग्न करु अशी त्या बापाची इच्छा; पण उद्धवस्त झालेलं सोयाबीन पाहून शेतकऱ्याची आत्महत्या

हे वाचलंत का ?

टीम झुंजार