आम्ही लग्नाळू : लव्ह के लिये साला कुछ भी करेगा; प्रियकराने मुलीचा ड्रेस घातला, प्रेयसीचे केले अपहरण… अवघ्या २४ तासात

Spread the love

जळगाव ( फैजपूर ) : – सध्या महाराष्ट्रात अपहरणाचा घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच लग्नासाठी कोण काय करेल यांचा नेम नाही. प्रेमात आणि युध्दात सर्व काही माफ असतं, असं म्हणतात. अगदी याचाच प्रयत्य जळगाव जिल्ह्यातील फैजपूर शहरात आला आहे. मुलीचा पंजाबी ड्रेस घालून प्रियकर थेट प्रेयसीच्या घरी आला.याठिकाणी प्रेयसीच्या ६० वर्षीय आजीच्या डोळ्यात स्प्रे मारुन प्रेयसीच्याच अपहरणाचा बनाव रचला आणि प्रेयसीला सोबत घेवून जात दोघांनी अवघ्या २४ तासात लग्नही केलं. लग्न करुन दोघेही पोलिसात हजर सुध्दा झाले. यामुळे पोलिसांच्याही भूवया उंचावल्या आहेत.या अनोख्या लव्हस्टोरीची अन् दोघांच्या लग्नाची जिल्ह्यात एकच चर्चा रंगली आहे. या प्रकरणात आजीच्या फिर्यादीवरुन प्रियकराविरोधात अपहरणचाही गुन्हा फैजपूर पोलिसात दाखल झाला आहे.

काय आहे घटना ?

या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसाप, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता ६० वर्षीय वृद्ध महिला आपल्या २२ वर्षीय नातीसह मंदिरात जाण्यासाठी निघाली होती. यावेळी बस स्थानकाजवळील प्रांत कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुलीच्या वेशात, पंजाबी ड्रेस परिधान केलेला एक तरुण चारचाकीने येऊन त्यांच्यासमोर उभा राहिला. या मुलाने एक स्प्रे आजीच्या डोळ्यावर मारला. यामुळे आजीला डोळ्यात जळजळ झाली. ही संधी साधून त्याने तरुणीला गाडीत धक्का मारुन बसवले. यानंतर चारचाकीने पलायन केले.

ही घटना घडल्यानंतर आजीने तात्काळ पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

सकाळी भररस्त्यावर घडलेल्या या घटनेबाबत पोलिसांना देखील संशय होता. त्यांनी आजीसह मुलीच्या पालकांची विचारपुस केली. परंतु, सर्वांनी अपहरण झाले आहे. अगदी मुलीचे कोणाशीही प्रेमसंबध नव्हते अशीच उत्तरे दिली. यामुळे पोलिसांनी तपासचक्रे फिरवण्यास सुरुवात केली.

पोलिसांचा तपास सुरू असतानाच मंगळवारी दुपारी संबधित तरुणी व तिला पळवून नेणारा तिचा प्रियकर तरुण हे दोघे लग्न करुन पोलिस ठाण्यात हजर झाले. लग्न करण्यासाठीच आम्हाला पळून जायचे होते, यासाठी अपहरण केल्याचा जबाब दोघांनीही पोलिसांना दिला. दरम्यान याप्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात नेमकं काय खरं आणि काय खोटं याचा तपास पोलीस करीत आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र मोरे हे करीत आहेत.

अनोख्या प्रेम विवाहाची गावात झाली चर्चा

प्रेमात माणूस काहीही करतो. लग्न करण्याची दोघांची प्रबळ इच्छा असल्यामुळे त्यांनी अपहरणाचा बनाव केला. कुटुंबींयाच्या अपरोक्ष काही तासातच लग्न केले. एकीकडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होतो तर दुसरीकडे त्यांच्या लग्नाच्या सनया वाजत होत्या. 24 तासात या नाट्याचा पदडा उघडतोच अनोख्या प्रेम विवाहाची बातमी समोर येते. या घटनेची संपुर्ण शहरात चर्चा रंगली आहे. तर तरुणाचे आजीच्या डोळ्यात स्प्रे मारला होता की नाही? याचा तपास पोलिस करीत आहेेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार