जळगाव :- राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी हनी ट्रॅपचे प्रकार उघड झाले आहे.अश्यातच जळगावात देखील एका डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवत त्याच्याकडून ७ लाखांची खंडणी मागण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात ४ महिला व ३ तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील रामानंद नगरात राहणारे डॉक्टर एका हॉस्पिटलमध्ये सेवा बजावतात. दि.१५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान काही तरुण तरुणींनी त्यांना अडकविण्याच्या उद्देशाने कट तयार केला
एका तरुणीने डॉक्टरांना शरीरसुखाची ऑफर देत त्याचे मोबाईलमध्ये शूटिंग केले. इतर तरुणांनी डॉक्टरांना मारहाण करीत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ७ लाखांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर व्हिडीओ समाजात व्हायरल करीत जिवनातून उठवून टाकण्याची धमकी दिली.
डॉक्टर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.