गो शाळेला गोवंश देण्याचा आदेश कायम!

Spread the love


Erandol :-अतिरिक्त सत्र न्यायाधीश जळगाव यांनी एरंडोल न्यायालयाचा समर्पण गोशाळेकडे पशुधनाचा ताबा व कब्जा ठेवण्याचा आदेश पारित केलेला आहे. ३१/८/२१ रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास एरंडोल म्हसावद रोडवरील मरीमाता चौक येथे विना परवाना पाच गोवंश जिवंत स्थितीत कत्तली साठी नेण्याचा उद्देशाने कोणतीही काळजी न घेता दाटीवाटीने कोंबून भरलेल्या स्थितीत मिळून आल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सदरील गोवंश पोलिसांच्या मदतीने समर्पण गोशाळा भालगाव येथे पाठविले व संबंधितांवर रीतसर गुन्हे दाखल करण्यात आले.

तदनंतर लुकमान शेख मुसा, स्नेह नगर औरंगाबाद यांनी सदरील गोवंशांचे तथाकथित मालक म्हणून एरंडोल मे. न्यायालयाकडे अर्ज दाखल केला न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग, एरंडोल यांनी सदरचा अर्ज नामंजूर करून सामनेवाला समर्पण गोशाळा भालगाव यांच्या ताब्यात व कब्जात देऊन सदरील गोवंशांना खावटी देणेचा आदेश पारित केला . सदरच्या आदेशा विरुद्ध लुकमान शेख मुसा याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश जळगाव यांच्याकडे फौजदारी रीव्हिजन अर्ज दाखल केला.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश जळगाव यांनी अर्जदार लुकमान शेख मुसा याचा अर्ज नामंजूर करत एरंडोल न्यायालयाचा गोवंश गोशाळेच्या ताब्यात व कब्जात ठेवण्याचा आदेश पारित केला . सा. वाला समर्पण गोशाळा, भालगाव यांच्यातर्फे अ‍ॅड .निरंजन व्ही. ढाके,अ‍ॅड. पवन के बऱ्हाटे यांनी कामकाज पाहिले. तर एरंडोल न्यायालयात अ‍ॅड. अजिंक्य ए काळे यांनी कामकाज पाहिले .

टीम झुंजार