दक्ष पोलिस मित्र संघटनेच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न.

Spread the love

महिलांनी स्वावलंबी आणि सक्षम झाले पाहिजे – उषाताई भगत

नगर / प्रतिनिधी

नगर : २० /महिलांनी कसलाही भेदभाव न ठेवता स्वतःला प्रगत करावे असे मत दक्ष पोलीस मित्र सामाजिक संघटनेच्या उपाध्यक्षा व राष्ट्रीय कार्याध्यक्षा शारदा कुलकर्णी यांनी नगर येथे व्यक्त केले . दक्ष पोलीस मित्र सामाजिक संघटनेच्या वतीने दि .१८ जानेवारी रोजी निर्मलनगर सावेडी येथे मकर संक्रांतीच्या निमित्ताने येथील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . नगरसेविका रूपाली ताई वारे आणि नगर शहर महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा उषाताई भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला .

यावेळी दक्ष पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष शहादेव मुंगसे तसेच रंजना सदावर्ते , राणी पंडित, अनिता भराट , दिपा ठाकुर, प्राची गवळी, सुनिता रोकडे, खामकर मॅडम, सोलाट मॅडम , पुरी मॅडम, पुष्पा वायकर , मीना झेंडे , शिंदे ताई आदि महिला उपस्थित होत्या .

नगर शहर महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा उषाताई भगत यांनी सांगितले की महिलांचे आरोग्य हे फक्त शारीरिक आणि मानसिक नसून आर्थिक आणि सामाजिक देखील आहे . आर्थिक आणि सामाजिक आरोग्यावर भर देण्यासाठी महिला स्वतः आर्थिक रित्या सक्षम बनली पाहिजे आणि स्वावलंबी व्हायला पाहिजे .

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दक्ष पोलिस मित्र सामाजिक संस्थेच्या नगर तालुकाध्यक्षा आसावरी वायकर , नगर शहर अध्यक्षा दिपाली जाधव , पाथर्डी तालुका महिला अध्यक्षा सुलताना शेख यांनी विशेष प्रयत्न केले .

टीम झुंजार