पुणे :- पुण्यात कधी काय घडेल याचा नेम नाही.शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असतानाच आता तरुणांचं भविष्य धोक्यात असल्याचं समोर आलं आहे. कारण, इथे एका गोडाऊनमध्ये पोलिसांनी असं काही पाहिलं ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. पुण्यात गुन्हेगारी वाढत असताना आता अशाच प्रकारची अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील एका गोडाऊन मधून तब्बल दहा लाख रूपयांचे सेक्स टॉईज जप्त करण्यात आले आहेत. आता विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातील तरुणाईला सेक्स टॉईजचे वेड लागले की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुण्यातील लष्कर पोलिसांनी या संदर्भात कारवाई केली असून एका गोडाऊनमधून तब्बल दहा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम २९२, २९३ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या वस्तू पुण्यातील काही अल्पवयीन मुलांना विकल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या वस्तूंची ऑनलाइन विक्री होत होती असं देखील पोलीस तपासात समोर आले आहे. आता या प्रकरणाची व्याप्ती किती खोलवर पोहोचली आहे याचा तपास करण्याचं आव्हान पुणे पोलिसांसमोर असणार आहे.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






