मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेला आज सुरूवात झाली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा ८९ धावांनी पराभव करून ऑस्ट्रेलियन भूमीवर २०११ नंतर कोणत्याही स्वरूपातील पहिला विजय नोंदवला. टीम साउथी (३/६) याने ऑसींच्या पडझडीला सुरुवात केली. मिचेल सँटनर (३/३१) तर ट्रेंट बोल्टने (२/२४) शेपटीची काळजी घेतली.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना डेव्हॉन कॉनवे (९२) आणि फिन ऍलन (४२) यांच्या सहाय्याने २००/३ पर्यंत मजल मारली. ऍलन आणि कॉनवे यांच्यातील सलामीची भागीदारी ५६ धावांची होती आणि ती केवळ २५ चेंडूत झाली. फिनने १६ चेंडूत ४२ धावा केल्या. त्यानंतर कॉनवेने कर्णधार केन विल्यमसनसह (२३) दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. जेम्स नीशमच्या १३ चेंडूंत २६ धावांच्या सहाय्याने कॉनवे सोबत चौथ्या विकेटसाठी २४ चेंडूत नाबाद ४८ धावांची भागीदारी केली. डेव्हॉन कॉनवे (९२) ला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.