भारतीय प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण याच्या वेळेस करणार आत्मदहन, सौ अलकाबाई सोनार पळासखेडा यांनी पत्रकारांना दिली माहिती.

Spread the love

अरुण तायडे प्रतिनिधी जामनेर

जामनेर:-भारतीय प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण याच्या वेळेस करणार आत्मदहन सौ अलकाबाई सोनार पळासखेडा यांनी पत्रकारांना दिली माहिती जामनेर प्रतिनिधी अरुण तायडे सविस्तर वृत्त असे ,की जामनेर तालुक्यातील पळासखेडा बुद्रुक येथील गटनंबर 42, गट नंबर 43, गट नंबर, २० हे गट बिनशेती कडे वर्ग करण्यात आले असून त्यासंबंधित किंवा शासकीय नियमाप्रमाणे शर्ती पूर्ण केलेल्या नाहीत त्याचप्रमाणे या अटी शर्ती या कमीत कमी 15 ते 20 वर्ष सुद्धा पूर्ण झाले आहेत अधिक माहिती शासकीय नियमाप्रमाणे एक वर्षात पूर्ण करायचे असताना पंधरा ते वीस वर्ष होऊन सुद्धा कारवाई काहोत नाही. वरील तिन्ही गटाच्या मालकांनी सविस्तर फुलांची विक्री विल्हेवाट केले असून त्यांना अटी शर्ती च पूर्ण नसताना बिन शेती कोणत्या आधारावर महसूल किंवा संबंधित विभागाने कोणत्या नियमानुसार किंवा कायद्यानुसार आधारावर सर्व परवानग्या कसे मिळाल्या यासंदर्भात चौकशी व्हावी मी अलकाबाई सोनार जळगावला प्रांत कार्यालयासमोर आत्मदहन करेल व माझ्या मृत्यूची सर्वस्वी जबाबदारी शासकीय अधिकारी प्रशासन राहील असे निवेदन अलकाबाई सोनार यांनी माननीय प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .

यासंदर्भात अलकाबाई सोनार यांनी माझी मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहन मी जळगाव येथे करेल अशी माहिती यांनी प्रतिनिधीशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले आहे. तरी जामनेर तालुक्यात सर्वसामान्य महिलेला जवळपास कित्येक वर्षापासून न्याय मिळत नसल्या कारणाने जामनेर तालुक्यात सह जळगाव जिल्ह्यातील महिलांना त्यांचा अधिकार किंवा त्यांना नाही मिळेल का या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तरी याकडे संबंधित लोकप्रतिनिधी माननीय आमदार साहेब तसेच पंचायत समितीचे सभापती तसेच गटविकास अधिकारी यांनी वेळीच लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा याकडे जामनेर तालुक्यातील सर्व नागरिकांचे व महिलांचे लक्ष वेधले आहे.

टीम झुंजार