गुरुग्राम – शहरातील सुटकेस कांडमध्ये नवा खुलासा झाला असून आरोपीने टीव्ही आणि वृत्तपत्रातून मृतदेह सुटकेसमध्ये टाकून फेकून दिल्याच्या बातम्या ऐकल्या आणि वाचल्या होत्या. तेच पाहून पतीला पत्नीची हत्या करून मृतदेहाचा बंदोबस्त करण्याची आयडिया सापडली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने या हत्याकांडाचा खुलासा केला आहे.
मागील सोमवारी गुरुग्रामच्या चौकात रस्त्याशेजारी एक बॅग बेवारस अवस्थेत आढळली. एका ऑटो चालकाची नजर त्या बॅगवर गेली त्याने पोलिसांना याबाबत कळवलं. सूचना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यानंतर जेव्हा बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यात एक मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. हा मृतदेह एका मुलीचा होता. तिच्या अंगावर कपडे नव्हते. शरीरावर झालेल्या जखमा पाहून तिच्यावर क्रूर अत्याचार झाल्याचं दिसून येते.
.सर्वात विचित्र म्हणजे मृत मुलीच्या हातावर चाकूने आणि जाळण्याचा प्रयत्न झाल्याच्या खूणा आढळल्या. कदाचित हातावर टॅटू असण्याची शक्यता होती. त्याला मिटवण्याचा प्रयत्न झाला असावा. बॅगेत मृतदेहाशिवाय इतर काहीही सापडले नाही. ज्यामुळे मृत मुलीची ओळख पटवता येईल. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला.
पोलिसांनी ज्या ठिकाणाहून बॅग जप्त केली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. योगायोगाने एका कॅमेऱ्यात एक माणूस तीच बॅग रस्त्यावर ओढताना दिसतो. भरदिवसा मृतदेह ठेवून, बॅग घेत बेधडकपणे रस्त्याने चालत होते. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अखेर पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली आणि लवकरच त्याला पकडले. त्याने आपला गुन्हाही कबूल केला. पण त्याने सांगितलेली हत्येची कहाणी खूप विचित्र होती.
आरोपी भाड्याच्या घरात राहत होता
आरोपी मारेकऱ्याचे नाव राहुल आहे. आणि ज्या महिलेचा मृतदेह बॅगेत सापडला ती त्याची पत्नी प्रियांका होती. दोघेही यूपीचे रहिवासी आहेत. दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी दीड वर्षांपूर्वी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. लग्नानंतर दोघेही गुरुग्रामला आले आणि तिथे भाड्याच्या घरात राहू लागले. राहुल गुरुग्राममध्ये एका कंपनीत काम करायचा. त्यांचा पगार फक्त १२ हजार रुपये होता.
चौकशीत राहुलने पोलिसांना सांगितले की, लग्नानंतर पत्नीने कधी टीव्ही तर कधी महागड्या मोबाईलची मागणी करायला सुरुवात केली. हे सर्व विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये भांडण सुरू झाले. सततच्या मागण्या आणि दिवसेंदिवस होणाऱ्या भांडणांना कंटाळून राहुलने पत्नीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
टीव्ही पाहिल्यानंतर आटडिया मिळाली
बॅगमध्ये मृतदेहाच्या अनेक कथा त्यांनी टीव्ही आणि वर्तमानपत्रात पाहिल्या आणि वाचल्या होत्या. १६ ऑक्टोबरच्या रात्री त्याचे पुन्हा पत्नीसोबत भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात त्याने पत्नी प्रियांकाचा गळा आवळून खून केला. पत्नीच्या हातावर त्याच्या नावाचा टॅटूही कोरला होता.त्यामुळे तो टॅटू पुसण्यासाठी राहुलने चाकूने पत्नीचा हात खरवडला आणि नंतर पेटवून दिला. यानंतर तो रात्रभर मृतदेहासोबत घरातच राहिला.
हे वाचलंत का ?
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……