पाचोरा :- सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडील खरेदीसाठी बाजारात गेले असता घरी एकटी असलेल्या १८ वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचलले आहे. गळफास घेऊन तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाचोरा शहरातील श्रीराम चौकात उघडकीस आली. रोहीणी प्रविण मिस्तरी (वय – १८ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे घटना ?
शहरातील जामनेर रोडवरील श्रीराम चौक येथे वास्तव्यास असलेल्या रोहीणी प्रविण मिस्तरी (वय – १८ वर्ष) हिने दि. २२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी आई, वडिल बाजारात गेले असता घरात एकटीच असतांना घराच्या छताला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. सदरची प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली.
रोहीणी हिस तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत रोहिणी हिची प्राण ज्योत मालवली होती. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून रोहिणी हिने आत्महत्या का केली ? या मागील कारण स्पष्ट होवु शकले नसुन पाचोरा पोलिस घटनेचा तपास करीत आहे. रोहिणी हिच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. रोहिणी हिचे पाश्चात्य आई, वडिल, एक भाऊ असा परिवार आहे.
हे वाचलंत का ?
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल






