भडगाव : – प्रेम प्रकरणातून अनेक प्रकार समोर येत आहेत. आता जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात एका तरुणीने थेट प्रियकराच्या घरावरच धाव घेतली. एवढच नाही तर त्याच्या आईला आणि वहिनीलाही धक्काबुक्की केली. आपल्या प्रियकरासोबत लग्न करून द्यावे, असे म्हणत एका तरुणीने सिनेस्टाइल प्रकारे थेट प्रियकराच्या घरी जात धिंगाणा घातल्याची घटना भडगाव तालुक्यातील एका गावात घडली. तरुणाशी माझे लग्न करून द्या, असे सांगून तरुणाची आई आणि वहिनीलाही तरुणीने चापटाबुक्क्यांनी मारहाण करत घरसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
भडगाव तालुक्यातील एका गावातील तरुणीचे संबंधित तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. आपले लग्न तरुणाशी लावून द्या, अशी मागणी करत तरुणाच्या घरात घसून तरुणाच्या आईला आणि त्याच्या वहिनीला शिवीगाळ करत माहराणही केली. एवढेच नाही तर जोपर्यंत तुमचा मुलगा घरी परत येणार नाही तोपर्यंत मी येथून जाणार नाही. नाहीतर मी तुमच्या घरासमोर आत्महत्या करून घेईन, अशी धणकीही तरुणीने मुलाच्या नातेवाईकांना दिली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भडगाव पोलीस कर्मचारी करीत आहे.
हे वाचलंत का ?
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………