औरंगाबाद :- सुभेदारी विश्रामगृह औरंगाबाद येथे श्रद्धेय बाळासाहेब यांचे मार्गदर्शनात प्रदेशाध्यक्ष रेखाताई यांचे आदेशानुसार अरुंधती ताई सिरसाट यांचे नेतृत्वात मराठवाडा अध्यक्ष मा. अशोक हिंगे पाटील यांचे अध्यक्षते खाली नांदेडच्या धम्म मेळाव्या संदर्भात चर्चा करण्यात आली या मिटींगला औरंगाबाद जिल्हा,शहर, तालुके,सर्व प्रतिनिधी हजर होते मुख्य मार्गदर्शन मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी केले.
सर्व बहुजनांनी नांदेड येथे नवा मोंढा मैदानात होणाऱ्या धम्म मेळाव्याला उत्स्फूर्तपणे उपस्थित राहावे असे त्यांनी जाहीर आवाहन केले.अकोला धम्म मेळाव्या नंतर पुणे येथील झालेल्या नभूतो न भविष्यती अशा प्रकारच्या धम्म मेळाव्याची त्यांनी आठवण करून दिली आणि आता नांदेड येथील होणारा धम्म मेळावा दिनांक 5नोव्हेंबर 2022स्थळ नवा मोंढा मैदान येथे असून हा धम्म मेळावा सुद्धा न भूतो न भविष्यती असा होईल असे त्यांनी मार्गदर्शन केले.

मराठा समाज हा शिवधर्माकडे वळत असतांना शिवधर्माचा शेवटचा टप्पा हा चलो बुद्ध की और आहे असे त्यांनी वक्तव्य केले. मी आज लातूरची मीटिंग उरकून औरंगाबादची मीटिंग उपस्थित केली यानंतर जालना आणि पुढील जिल्ह्यामध्ये मिटिंगा घेऊन धम्म मेळाव्याची जय्यत तयारी करत आहे. नांदेड येथील धम्म मेळाव्याचे आयोजन भारतीयबौद्ध महासभा यांचे कडून केले असून बौद्धमहासभेचे प्रमुख सल्लागार विधीतज्ञ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करणार असून त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.

आजच्या बैठकीला मराठवाडा कार्यक्रम प्रमुख जितेंद्र भाऊ शिरसाट ,डॉक्टर नितीन सोनवणे,औरंगाबाद पूर्वचे अध्यक्ष प्रभाकर बकले, पश्चिमचे अध्यक्ष योगेश बन, महिला जिल्हाध्यक्ष लताताई बामणे, महिला आघाडी शहर अध्यक्ष वंदनाताई नरवडे,पश्चिम अध्यक्ष संदीप भाऊ सिरसाट ,मध्य अध्यक्ष अहमद जलीस,वैजापूर तालुका अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ तेजाड कन्नडचे तालुका अध्यक्ष देवीदास राठोड साहेब , जिल्हा उपाध्यक्ष रूपचंद गाडेकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई,महासचिव ऍडव्होकेट पंकज बनसोडे, संघराज धम्मकीर्ती,राजू देहाडे, मेघानंद जाधव,गणेश वाघ, मिलिंद बोर्डे, बाबासाहेब श्रीखंडे सुभाष कांबळे,बाबासाहेब दुशिंग,

संतोष जाधव,रोहन गवई, प्रदीप धनेधर, अतिक पटेल, अशोकराव कानडे, शिवम साळवे दादाराव लोखंडे पाटील,सुरेश भालेराव,जावेद पटेल, आयुष्मान लक्ष्मण सटवाजी धनेधर,अशोक खिल्लारे, हनीफ पटेल, लतीफ जब्बार खान, सिद्धार्थ बनकर,साजिद जगताप प्रभाकर राजू शिवाजी उघडे,ज्योती गौतम जाधव, ताराबाई नारायण जाधव वैशाली राणेकर, कोमल हिवाळे,,कविता रवींद्र जाधव, ,प्रीती गायकवाड,पार्वती चव्हाण, नर्मदा देंडगे, ऍड. अर्चना बामणे,अजय मस्के, भरत दाभाडे,वैशाली राणी, नर्मदा देंडगे,अर्चना बामणे, जया गजभिये,पंडितराव तुपे, प्रभाकर ढोले,छाया जमदाडे, तारा जाधव, कविता जाधव, सरला जाधव प्रीती गायकवाड,आदींची प्रमुख उपस्थिती होती. सूत्र संचालन भाऊराव गवई यांनी तर आभार पंकज बनसोडे यांनी मानले.






