अमळनेर : उच्च न्यायालयाच्या आदेशाने अनुकंपावर नोकरीला लागूनदेखील दहा लाख रुपये मागितले आणि अतिरिक्त ठरविल्याने तालुक्यातील शिरूड येथील शिपायाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी संस्थाचालकांसह ११ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तुषार भाऊराव देवरे (रा. सारबेटा) २०१३ मध्ये ग्रामविकास शिक्षण मंडळ, मुडी या संस्थेच्या सारबेटा येथील सार्वजनिक विद्यालयात अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लागले होते. २०१६ मध्ये तुषार देवरे यांची संस्थेच्या शिरूड येथील व्ही. झेड. पाटील हायस्कूलमध्ये बदली करण्यात आली. संस्थेतील कायम संचालक रमेश विनायक पाटील, सचिव सुनील पंढरीनाथ पाटील, प्रभारी अध्यक्ष पंजाबराव पांडुरंग पाटील, संचालक जयवंतराव अमृतराव पाटील, कमलाकर विनेश पाटील, दीपक चंदन पाटील, शालेय समिती सदस्य शशिकांत रघुनाथ पाटील यांनी दहा लाख रुपये देणगी मागितली. पैकी तुषारने ग.स. पतपेढीतून दोन लाख कर्ज काढून दिले, तरीही उर्वरित पैशांसाठी त्यांनी तगादा लावला आणि हेतुपुरस्सर अतिरिक्त केले.
कर्मचारी दिनेश वसंत पाटील व सचिन संजीव काटे, डॉ. शरद शिंदे व अनिल लोटन पाटील निवृत्त मुख्याध्यापक यांनी मानसिक त्रास दिला म्हणून तुषारने चोपडा रोडवरील उड्डाणपुलाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केली होती.आत्महत्येपूर्वी तुषारने तीन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या.तसेच दीपक पाटील, रमेश पाटील, जयवंतराव पाटील, कमलाकर पाटील, कर्मचारी दिनेश पाटील, अनिल पाटील, सचिन काटे, शालेय समिती सदस्य शशिकांत पाटील आत्महत्येस जबाबदार आहेत, असेही पत्र लिहून ठेवले होते. माझ्या आत्महत्येस जबाबदार लोकांना सोडू नको, संस्थेची व संस्थेच्या शाखांची पूर्णपणे सखोल चौकशी व्हावी, बोगस मान्यता वगैरे या गोष्टींवर लक्ष द्यावे, संस्थेमध्ये काही लोकांनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केले आहेत, असा उल्लेख आहे. तुषारची पत्नी प्रतीक्षा हिच्या फिर्यादीवरून ११ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी तपास करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………