एरंडोल – तालुका काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणूका पार पाडल्या असल्या तरी एरंडोल तालुका काँग्रेसचे अध्यक्षपदी योगेश महाजन यांची निवड बेकायदेशीर असल्याची तक्रार सुनील पाटील यांनी केली असून नियुक्ती पत्र देवू नये अशी लेखी तक्रार जिल्हाध्यक्षांसह मुंबई, दिल्लीला तक्रार केली असल्याने खळबळ उडाली आहे. एरंडोल तालुक्यातील बाम्हणे येथील निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते सुनील गोविंदा पाटील (मो. 9545729430) यांनी जळगांव जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांचेकडे दि. 30/10/2022 रोजी लेखी तक्रार केली असून त्यात म्हटलीे आहे की,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने एरंडोल तालुका काँग्रेस अध्यक्षपदी श्री. योगेश युवराज महाजन यांची निवड केल्याबाबतचे पत्र दि. 29/10/2022 रोजी पहावयास मिळाले. मुळातच ही निवड बेकायदेशीर झालेली आहे. अध्यक्षपदाची निवडप्रक्रिया यापूर्वीच रितसर पार पडलेली असल्याने त्यावेळी योगेश महाजन यांनी अर्ज देखील दाखल केलेला नव्हता तरी देखील त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड झालेली आहे. याबद्दल माझा तीव्र आक्षेप असून सदरची निवड बेकायदेशीर असल्याने मला वरिष्ठांकडे अपील दाखल करावयाचे आहे.
माझ्या अपीलाचा निर्णय लागेपर्यंत योगेश महाजन यांना नियुक्तीपत्र देवू नये तसेच तालूकाध्यक्षपदाची झालेली निवडणूक कागदपत्रे (मिटींग अजेंडा, प्रोसिडींग झेरॉक्स, उमेदवारी अर्ज, माघारीचे अर्ज, निवडणूक निर्णय अधिकारींचा निर्णय यांसह सर्व कागदपत्रे) मिळावीत असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे खरा अध्यक्ष कोण ? असा प्रश्न असून वरिष्ठांच्या निर्णयाकडे अथवा तालुका काँग्रेसच्या स्पष्टीकरणाकडे आता लक्ष लागले आहे. सदर बाबतीत संबंधितांनीं योग्य, अधिकृत खुलासा करावा-संपादक टीम झुंजार