तिरुअनंतपुरम : ( Kerala Murder Case )सध्या देशात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच प्रियकर शेरॉन राजच्या (Sharon Raj Murder) हत्या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या २२ वर्षीय तरुणीने (Greeshma) आत्महत्येचा प्रयत्न केला. लादी साफ करण्याचे द्रव्य प्राशन करुन प्रेयसीने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. केरळमधील (Kerala Murder Case) तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील नेदुमंगडू पोलीस स्टेशनमध्ये तिने टोकाचं पाऊल उचललं. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुअनंतपुरमजवळील काराकोनम येथील रहिवासी असलेल्या ग्रीष्माने सोमवारी सकाळी पोलिस स्टेशनच्या टॉयलेटमध्ये फ्लोअर क्लीनर जंतुनाशकाचे सेवन केले. तिला ताबडतोब तिरुअनंतपुरमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे तिला अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
तिरुअनंतपुरममधील शेरॉन राज या २३ वर्षीय तरुणाच्या गूढ मृत्यूच्या काही दिवसांनंतर त्याची मैत्रीण ग्रीष्माने पोलिसांसमोर कबूल केले होते, की तिनेच त्याला प्यायला दिलेल्या कश्याममध्ये (आयुर्वेदिक मिश्रण) विष मिसळले होते. तिला तरुणासोबतचे तिचे नाते संपवायचे होते, कारण तिचे लग्न दुसऱ्या पुरुषाशी ठरले होते, परंतु शेरॉन ब्रेकअपसाठी तयार नव्हता.
एडीजीपी (कायदा व सुव्यवस्था) एमआर अजित कुमार यांनी सांगितले की, ग्रीष्माने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ग्रीष्माने शेरॉनला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कश्याममध्ये कीटकनाशक मिसळले होते. तिला हे नाते संपवायचे होते, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी कपिक कीटकनाशकाची बाटली जप्त केली आहे. याचा तिने हत्येसाठी वापर केला असल्याचा संशय आहे. घटनेपूर्वी तिने विष प्राशन करण्याबाबत गूगलवर सर्चही केले असल्याचेही पोलिसांना आढळून आले.
नेमकं काय घडलं होतं?
शेरॉन १४ ऑक्टोबर रोजी ग्रीष्माच्या घरी आला होता. तिथे तिने त्याला कश्याम देऊ केले होते. वेदना कमी करण्यासाठी आपणही ते पित असल्याचा दावा तिने केला होता. ते चवीला कडू असल्याने तिने त्याला सोबत आंब्याचा रसही दिला. शेरॉनसोबत आलेल्या मित्राने जबाबात सांगितले, की घरी परतत असताना त्याला उलट्या होत होत्या. त्याच दिवशी, तो परसाला सरकारी रुग्णालयात गेला, तिथून त्याला तिरुअनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, त्यावेळी त्याच्या ब्लड टेस्टचे रिपोर्ट सामान्य असल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले.
दुसऱ्या दिवसापासून, शेरॉनला आरोग्याचा गंभीर त्रास होऊ लागला. त्यामुळे तो अन्य डॉक्टरकडे गेला. अखेर १७ ऑक्टोबर रोजी त्याला पुन्हा एकदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यावेळी त्याच्या रक्त तपासणीच्या अहवालात मोठी तफावत आढळून आल्याने त्याला ताबडतोब आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याच्या अंतर्गत अवयवांना इजा झाल्याचे डॉक्टरांना आढळले. २५ ऑक्टोबर रोजी अवयव निकामी झाल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने शेरॉनचा मृत्यू झाला.
तिरुअनंतपुरम ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख डी शिल्पा यांनी सांगितले की ग्रीष्माची सोमवारी अटक करण्यात आली. तिचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सामान्य झाल्यावर पुरावे संकलनासाठी तिला नेले जाईल. शेरॉनच्या मृत्यूपासूनच ही नियोजित हत्या असल्याचा आरोप त्याचे कुटुंबीय करत आहे
11 दिवसांनंतर उपचारादरम्यान शेरोनचा मृत्यू
रुग्णालयात 11 दिवसानंतर उपचारादरम्यान अखेर शेरोनचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर शवविच्छेदन अहवालात विष पोटात गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी गरिश्माची चौकशी केली असता तिने सुरवातीला पोलिसांना खोटे सांगितले.
शेरोनने जबाबात आपला कुणावर संशय नसल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र पोलिसांना प्रेयसीवरच संशय असल्याने पोलीस तिची कसून चौकशी करत होते. अखेर चौकशीदरम्यान तिने आपला गुन्हा कबुल केला. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे.
हे वाचलंत का ?
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………