जळगाव :- शिवसेना उपनेत्या सुषमा ताई अंधारे ( Sushma Tai Aandhare) यांच्या महाप्रबोधन यात्रेवरुन वातावरण तापलं आहे. पोलिसांनी मुक्ताईनगरच्या सभेवर बंदी घातली असून सुषमा अंधारे सभास्थळी निघाल्या असत्या पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आल्यानं वातावरण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांची महाप्रबोधन यात्रा जळगावात सुरु आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, किशोर पाटील आणि चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघात सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेच्या सभा पार पडल्या. आज सुषमा अंधारेंची सभा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात होणार होती. मात्र, पोलिसांनी सुषमा अंधारे यांच्या सभेवर बंदी घातली. मात्र, त्या सभेवर ठाम असल्यानं त्यांना के. प्राईड हॉटेलबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी सुरु केली आहे.
सुषमा अंधारे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना डी वाय एसपी दर्जाचे अधिकारी, पाचशे पोलिसांना गराडा घातलाय. तणावाचं वातावरण आहे. माझा नेमका गुन्हा काय आहे. माझ्याकडून काय गुन्हा घडला आहे त्यामुळं दमन यंत्रणेचा वापर केला जात आहे. आम्ही सभेला निघालो असून आम्हाला रस्त्यावर अडवलं आहे. गुलाबराव पाटलांनी सुडाचं राजकारण माझ्या विरोधात का सुरु केलं आहे,असा सवाल अंधारे यांनी केला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे की नाही, ही परिस्थिती माहिती नाही. पोलिसांनी सभेला जाण्यास मज्जाव केला आहे. परंतु, काय कारण आहे हे कळलेलं नाही, आपल्या अटकेचं कारण काय, दोष काय हे अजून सांगितलेलं नाही. आमच्याविरोधात दमणयंत्रणा राबवण्यात आहे. पाचशे पोलीस पुढं आहेत. महिला पोलीस आहेत. मी काय दहशतवादी आहे का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
गुलाबराव पाटील साहेब, आपण सत्तेचा गैरवापर करत आहात. आपण सुडाचं राजकारण करत आहात, सत्ता हाताशी असल्यानंतर कुणीही अशी अरेरावी, दंडेलशाही करु शकतं. पण त्यात काही विशेष नाही. गुलाबराव पाटील मी तुमचीच बहीण आहे. तुमच्याच इलाख्यात येऊन तुम्हाला ऐलान केलं आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं असून ते माझ्या पाठिशी आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
या देशात जो कोणी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. ऋतुजा लटके, किशोरी पेडणेकर यांच्यानंतर आता सुषमा अंधारे यांना छळलं जात आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.