चाळीसगाव : – सध्या महाराष्ट्रात महिला लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार चाळीसगाव तालुक्यात घडला आहे. धक्कादायक म्हणजे या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय मुलगी आपल्या आई वडील व भावासह वास्तव्यास आहे. पीडीतेच्या घरासमोर संशयीत आरोपी राकेश युवराज जिरे (22) हादेखील वास्तव्यास असून त्याने पीडीतेशी सलगी वाढवत तुला पसंत करतो, माझ्याशी लग्न कर म्हणत पीडीतेचा पाठलाग करून तिच्यावर सन 2021 ते एप्रिल 2022 दरम्यान वारंवार अत्याचार केला
तसेच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकारातून पीडीता गर्भवती राहिली तसेच आरोपीने पीडीतेच्या आई-वडिलांना व भावाला जीवे ठार मारेल, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. आरोपी राकेश युवराज जिरे (22) याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्य निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






