जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
बोलक्या स्वभावाचा फायदा होईल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. नातेवाईकांची एखादी कृती मन खिन्न करू शकते. सासरच्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. वाहन चालवताना खबरदारी घ्यावी.
वृषभ :-
उत्तम प्रशासक बनाल. आपला सन्मान वाढेल. लहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. बोलताना तारतम्य बाळगा.
मिथुन :-
सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. अति धाडस करू नका. कामात दुर्लक्ष करू नका. हातातील काम व्यवस्थित पूर्ण होईल. मित्रांशी असलेले नाते घट्ट होईल.
कर्क :-
अविचाराने पैसा खर्च करू नका. बाजू मांडून गैरसमज दूर करा. घरातील वातावरण खेळकर राहील. मन विचलीत होण्यापासून थांबवा. विरोधक परास्त होतील.
सिंह :-
अचानक प्रवास करावा लागेल. हवे असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. आपला प्रभाव वाढेल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. छोटे प्रवास लाभदायक ठरतील.
कन्या :-
नवीन उधारी देऊ नका. व्यवसायात कोणाच्याही बोलण्यावर संपूर्ण विश्वास ठेऊ नका. ग्रहमानाचे पाठबळ लाभेल. चांगल्या गोष्टीसाठी खर्च केला जाईल. प्रलंबित येणी प्राप्त होतील.
तूळ :-
सर्वांशी गोड बोलून कार्यभाग साधाल. अति तिखट पदार्थ खाणे टाळावे. जमिनीचे व्यवहार पूर्ण कराल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. प्रयत्नात सकारात्मकता दिसून येईल.
वृश्चिक :-
घरातील मोठ्यांचा आदर करावा. स्पर्धेत यश मिळेल. मनातील विचारांना योग्य दिशा द्या. मानसिक शांतता जपावी. मौल्यवान वस्तु खरेदी केल्या जातील.
धनू :-
आपल्या बोलण्यावर संयम ठेवा. व्यावसायिक ठिकाणी प्रशंसा केली जाईल. नियोजित कामे पूर्णत्वास जातील. मित्रांची मदत घ्याल. अति विचार करू नका.
मकर :-
जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढीस लागेल. हातातील काम पूर्णत्वास जाईल. वरिष्ठांची मदत मिळेल. मनोरंजनात वेळ घालवाल.
कुंभ :-
नियोजनबद्ध कामे केली जातील. समोरील कामाकडे अधिक लक्ष द्यावे. हातातील संधी सोडू नका. आहारावर नियंत्रण हवे. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.
मीन :-
शांत राहून कामे करावीत. आततायीपणे कोणतीही कृती करू नका. सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. सन्मानात वाढ होईल. भडक डोक्याने वागू नका.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






