मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि व्हिज्युअल आर्टस मध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम ११ नोव्हेंबरपर्यंत असून त्याचे आयोजन महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी एड. आप्पासाहेब देसाई, अध्यक्ष नंदकुमार काटकर, संचालक अशोक चव्हाण आणि प्रा. स्वप्निल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात तंत्रशिक्षणाची ओळख, सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व कौशल्य, उत्तम आरोग्य आदींचे मार्गदर्शन आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन संचालक प्रा. अशोक चव्हाण आणि सर्व विभाग प्रमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तंत्रशिक्षणाचे महत्व, वर्तमान स्थिती आणि संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधाची माहिती दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रथम वर्षाचे विभागप्रमुख डॉ. ए. वाय. शेटे यांनी केली. समन्वयक म्हणून डॉ. राजीव रंजन, प्रा. शायनी साजू, प्रा. निता वनगे, प्रा. सायस लाड काम पाहत आहेत.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.