सोयगाव :- सोयगाव पंचायत समिती कार्यालयाचा गुरुवारी (दि.०४) सोयगाव तहसिल कार्यालयाच्या पथकाने केलेल्या पंचनाम्यात पंचायत समिती कार्यालयात बारा कर्मचाऱ्यांपैकी केवळ तीन कर्मचारी हजर तर उर्वरित सर्व स्वाक्षरी करून फरारी असल्याचे आढळून आले तर पाच कर्मचारी चक्क गटविकास अधिकाऱ्यांसोबत औरंगाबादला असल्याचे पंचनाम्यांच्या आधारे निष्पन्न झाले आहे.
सोयगाव पंचायत समिती कार्यालयात गुरुवारी सोयगाव पासून ६० की मी असलेल्या उप्पलखेडा या गावातून आणि घोसला येथून काही नागरिक शासकीय कामांसाठी आले असता, त्या ठिकाणी या नागरिकांना एकही कर्मचारी टेबलावर आढळून आला नव्हता,त्यामुळे या संतप्त नागरिकांनी तहसिल कार्यालयात केलेल्या तोंडी सूचनेवरून निवासी नायब तहसिलदार गोरखनाथ सुरे यांच्या पथकाने पंचायत समिती कार्यालयाचा पंचनामा केला यामध्ये तीन कर्मचारी हजर तर उर्वरित सगळ्याच विभागांची कर्मचाऱ्यांनी हजेरी रजिस्टर वर स्वाक्षरी करून कार्यालयात दांडी मारल्याचे निष्पन्न झाले होते,
दरम्यान बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी व इतर कर्मचाऱ्यांनी सोयीस्कर पणे दौरे दाखवून दौरे दाखविले तर गटविकास अधिकारी प्रकाश नाईक हे औरंगाबाद येथील बैठकीला गेले मात्र त्यांच्या सोबत चक्क पाच कर्मचारी घेऊन गेल्या चे पंचनाम्यांत नमूद आहे..
पंचनाम्यांच्या अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्य कारी अधिकारी डॉ विकास मीना यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठविण्यात येणार असल्याचे पंचनामा पथक प्रमुख गोरखनाथ सुरे यांनी सांगितले.

हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






