नापिकी व कर्जाला कंटाळून वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

Spread the love

झुंजार प्रतिनिधी । एरंडोल :- सततची नापिकी आणि खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे या आर्थिक विवंचनेत असलेल्या 74 वर्षी शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत माहिती अशी की कासोदा दरवाजा परिसरातील रहिवासी निळकंठ महादू खैरनार वय 74 वर्षे यांनी आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास पंकज मुरलीधर काबरे यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.
निळकंठ खैरनार हे अनेक दिवसांपासून सततच्या नापिकीला कंटाळून चिंताग्रस्त झाले होते. तसेच त्यांनी खाजगी सावकाराकडून देखील कर्ज घेतले होते. पिकांचे झालेल्या नुकसानीमुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते.

त्यांचा मुलगा विनोद खैरनार हा सुरत येथे शेती काम करीत असतो दिवाळीनिमित्त विनोद खैरनार हा एरंडोल येथे वडिलांकडे आलेला आहे. दीड वाजेच्या सुमारास विनोद खैरनार घरी असताना धीरज भोई यांनी नीलकंठ खैरणार यांनी पंकज कांबरे यांच्या शेतात झाडाला गळफास घेतला असल्याचे सांगितले.
विनोद खैरनार यांनी धीरज भोई, गोपाल पाटील, धनराज गुजर, बाळा वंजारी, यांचे सह शेताकडे धाव घेतली असता निळकंठ खैरनार हे झाडाला गळफास घेऊन लटकलेले दिसले विनोद खैरनार व त्यांच्या सहकाऱ्यांनी निळकंठ खैरनार यांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.मुकेश चौधरी यांनी त्यांची तपासणी करून ते मयत झाल्याचे सांगितले

याबाबत शरद खैरनार यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सुनील लोहार अनिल पाटील हे पुढील तपास करीत आहे मयत नीलकंठ खैरनार परिवारासह शेती काम करून आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवत होते. तसेच पांडव गार्डन येथे रात्री ते पान दुकान देखील चालवत होते यापूर्वी ते वसंत सहकारी साखर कारखान्यात नोकरीच होते मात्र वसंत कारखाना बंद पडल्यामुळे त्यांचे समोर रोजगाराची समस्या निर्माण झाली होती. सध्या स्थिती ते शेती काम करून पान दुकान चालवून परिवाराच्या चरितार्थ भागवत होते

हे पण वाचा


टीम झुंजार