झुंजार प्रतिनिधी । एरंडोल :- भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशरने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मोटरसायकल चालक जागीच ठार झाला. हा अपघात आज सकाळी 11:00 वाजेच्या सुमारास म्हसावद रस्त्यावरील खेडगाव तांडा गावाजवळ घडला
याबाबत माहिती अशी की राजेंद्र सुरसिंग पाटील राहणार पाथरी तालुका जिल्हा जळगाव हे आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक एम एच 19 सी 49 42 ने म्हसावद कडून एरंडोल मार्गे जवखेडा ता एरंडोल येथे आपल्या सासरवाडीत जात होते.
त्याचवेळी खेडगाव तांडा गावाजवळ त्यांच्या मोटर सायकलला आयशर क्रमांक एम एच 19 झेड 5196 ने समोरून जोरदार धडक दिल्यामुळे त्यांच्या जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच त्यांचे शालक समाधान महादू पाटील यांनी घटनास्थळी नाव घेतली स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने राजेंद्र पाटील यांना ग्रामीण रुग्णालयात आणले. मयत राजेंद्र पाटील हे पत्नीसह शेती काम करून परिवाराच्या उदरनिर्वाह करीत होते.
त्यांचे पश्चात पत्नी एक विवाहित मुलगी व मुलगा असा परिवार आहे. याबाबत समाधान महादू पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून आयशर चालक नईमुद्दीन कयामोद्दीन शेख राहणार मुल्ला वाडा एरंडोल यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक न्यानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार महेंद्र पाटील हे पुढील तपास करीत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






