चाळीसगाव प्रतिनिधी नेहा राजपूत
चाळीसगांव – पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. नगरपालिका क्षेत्रात पर्यावरण संतुलन व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानाचे मूल्यमापन होणार असून यासाठी विविध वर्गवारीत गुणांचा समावेश आहे. पृथ्वी पंचतत्त्वांनुसार सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन नवीन हरितक्षेत्र विकास योजनेचे नियोजन करण्यात येत आहे. हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदूषण कमी केले जाणार आहे.
पंचतत्त्वानुसार तलाव संवर्धन, जैवविविधतेचे जतन, जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन तलावांसह सार्वजनिक विहिरीची स्वच्छता, रेनवॉटर हार्वेस्टिंग, असे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. अग्नी तत्त्वांनुसार ऊर्जेचा परिणामकारक वापर व बचत, अपारंपरिक ऊर्जानिर्मिती, बायोगॅस प्रकल्प, सौरऊर्जेवर एलईडी दिवे लावण्याचे नियोजन आहे. विद्युत वाहनाकरिता चार्जिंग पाइंट निर्माण करण्यात येणार आहे. आकाश तत्त्वानुसार स्थळ आणि प्रकाश या स्वरुपात मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती आणि शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे प्रसार व प्रचार केला जाणार आहे. नगरपालिका क्षेत्रात अनेक वस्त्यांचा झपाट्याने विस्तार होत आहे. शहरातील पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
चाळीसगांव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगांव नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ७ मधील वैभव कॉलनीतील खुल्या भूंखडावर भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यांत आली. त्यात शहरातील विविध नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, विश्वात्मा प्रतिष्ठान, कबीर फौंडेशन या सामाजिक संस्था यांनी पर्यावरण संवर्धंनाच्या दृष्टीने ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली असुन व वृक्ष लागवडीत ज्याना मोलाचा वाटा आहे तसेच सौरऊर्जा प्रकल्प आस्थापित करून अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा वापर करून पर्यावरण संवर्धंनाच्या दृष्टीने केलेल्या सहकार्याबद्दल अशा नागरीकांचा व संस्थाचा “वृक्षमित्र सन्मान” पत्र व गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शहरातील पर्यावरण प्रेमी विश्वात्मा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.राहूल वाकलकर यांचा ‘वृक्षमित्र सन्मान’ पत्र देऊन गौरवण्यात आले. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, कबीर फौंडेशन या संस्थेना गौरवण्यात आले.
सौरऊर्जा प्रकल्प आस्थापित केल्याबद्दल प्रा.अनिल मगर, डॉ.सौरभ अरकडी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी चाळीसगांव नगरपरिषदेचे उद्यान पर्यवेक्षक सचिन निकुंभ, विद्युत अभियंता कुणाल महाले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रभागातील नागरिक सोमनाथ माने, भारत वाघमारे, मोरे गुरुजी, शिवदास गुरुजी, प्रा.अनिल मगर, भास्कर पाटील, कोठावदे सर, अनिल विसपुते, संजय सोनार, अॅड.राहूल वाकलकर, सुधाकर देवकर, मनोज गोसावी, जगदीश चव्हाण, रविंद्र सोनवणे, देवेंद्र दाभाडे, राजू जाधव, रोहीत चौधरी, रमेश सोनवणे, महेंद्र चौधरी, स्वप्नील जाधव, प्रकाश पाटील, महेश अमृतकार, बंटी पाटील, गणेश जाधव, सागर पाटील इ. नागरीक उपस्थित हेाते. तसेच नगरपरिषद कर्मचारी वृंद यांनी मेहनत घेतली.