मुंबई :- अब्दुल सत्तार यांनी सोमवारी सकाळी साधारण बाराच्या सुमारास सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अवघ्या काही तासांमध्ये या आंदोलनाचे लोण मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे अशा विविध भागांमध्ये पसरले. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन केले.
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यात उमटत आहेत. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही तासांपासून महाराष्ट्रात अक्षरश: रान उठवले आहे. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी नाहक ओढवून घेतलेल्या या वादामुळे शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अब्दुल सत्तार यांच्यावर प्रचंड संतापले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना फोन करून त्यांचे कान टोचल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना तातडीने सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या गटाच्या सर्व प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या काही तासांपासून हा मुद्दा प्रचंड तापवला आहे. त्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर द्यायचे किंवा हा वाद शांत करण्यासाठी काय केले पाहिजे, यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
अब्दुल सत्तार यांनी सोमवारी सकाळी साधारण बाराच्या सुमारास सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अवघ्या काही तासांमध्ये या आंदोलनाचे लोण मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे अशा विविध भागांमध्ये पसरले. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन केले. तर अब्दुल सत्तार यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान आणि औरंगाबाद येथील घरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धडक मारली. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर स्वस्थ बसून देणार नाही, असे विद्या चव्हाण यांनी ठणकावून सांगितले.
सत्तार नक्की काय म्हणाले ?
मराठवाड्यातील सिल्लोडमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि खासदार एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडणार होती. या सभेच्या नियोजनाची जबाबदारी सत्तारांकडे होती. याआधी सत्तारांवर सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. सत्तारांना 50 खोके मिळाले का, असा प्रश्न सुळेंनी केला होचा. या टीकेबाबत उत्तर देताना सत्तारांचे जीभ घसरली. “तुम्हालाही 50 खोके द्यायचे का?” तसेच इतकी भिकार@# झाली असेल तर तिलाही देऊ”, अशा एकेरी भाषेत म्हणत गलिच्छ शब्दात सत्त्तारांनी टीका केली.
अब्दुल सत्तार यांना पुन्हा झापलं
यापूर्वी केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्य सरकार नवी योजना सुरु करेल, अशी घोषणा अब्दुल सत्तार यांनी परस्पर करून टाकली होती. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा कोणताही निर्णय झाला नव्हता. तरीही सत्तार यांनी योजनेसाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीचा विचार न करता अतिउत्साहाच्या भरात शेतकऱ्यांसाठी योजनेची घोषणा केली होती. यावरुन अर्थमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांना चांगलेच फैलावर घेतले होते. यापूर्वी शिंदे गटाचेच मंत्री तानाजी सावंत यांना अशाप्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सक्तीचे मौन बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता अब्दुल सत्तार यांच्यावरही असेच निर्बंध लादले जाणार का, हे पाहावे लागेल.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.