‘खापर पंजोबा खाली येऊ दे, आडवा केल्याशिवाय राहणार नाही.’
जळगाव : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच शिवसेनेतून चाळीस आमदारांनी बंड केले, चाळीस आमदार फुटले, पण फक्त मला टार्गेट केलं जात आहे. पुढच्या निवडणुकीत मला पाडण्यासाठीच हे सुरू आहे, असा आरोप राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. जळगाव तालुक्यातील फुपनगरी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमात भाषण करताना ते बोलत होते.
आडवा केल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, मी दलित, पीडित, शोषित, उपेक्षित सर्वांची काम करतो. त्यामुळे कोण खापर पंजोबा खाली येऊ दे, आडवा केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांना इशारा दिला. मंत्री झाल्यामुळे सांभाळून बोलावं लागतं, काही बोलायल लागला की टीव्हीवाले उलट सुलट काहीही दाखवतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
…तर घरी बसेल
ते पुढे म्हणाले की, 40 आमदार फुटले, पण दुसरा कोणी सापडत नाही, एकटा गुलाबरावला पकडला आहे. त्यांना असं वाटतं की गुलाबराव पाटलाला टार्गेट करायचं आणि येत्या निवडणुकीत पाडून टाकायचं. पण मी कामावर बोलणार आहे, काम करूनही लोक माझ्या पाठीशी राहणार नसतील तर ठीक आहे, लोक जे न्याय देतील तो नम्रपणे स्वीकारेल आणि घरी बसेल, असंही ते म्हणाले.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.