महिलाबंद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांचा जामनेरात महाविकास आघाडीकडुन निषेध

Spread the love

जामनेर (प्रतिनिधि):- संसदरत्न खा.सुप्रिया सुळे व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विषयी शिवराळ भाषेत वक्तव्य करून महिलांविषयी मनात असलेली गरळ ओकणार्या मंत्री अब्दुल सत्तार व गुलाबराव पाटील यांचा आज संजयदादा गरुड़ यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस यांच्या वतीने प्रतिकात्मक दहन करीत निषेध करण्यात आला.राज्याचे क्रुषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खा.सुप्रिया सुळे यांना उद्देशून अर्वाच्च शब्दांचा वापर करून संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार यांचा अपमान केला.

दुसरीकडे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विषयी अपमानास्पद शब्द वापरून या दोनही नेत्यांनी महिलांविषयी आपल्या खालावलेल्या वैचारिक पातळीची ओळख जनसामान्यांना करून दिली.असा आरोप करीत याचा महाविकास आघाडी कडून तिव्र निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील,डिंगबर पाटील,दगडू पाटील,भास्कर पाटील तालुकाध्यक्ष विलास राजपूत विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील,सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष संदीप हिवाळे

ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष राजेश चव्हाण,डॉ. बाजीराव पाटील,शिवसेनेचे अँड.ज्ञानेश्वर बोरसे, शिवसेना मा.शहराध्यक्ष सुधाकर सराफ,शिवसेना शहराध्यक्ष अतुल सोनवणे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष राजीव भाई जेंटलमेन अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आणि पैलवान युवक शहराध्यक्ष सचिन बोरसे युवक जिल्हा सरचिटणीस विनोद माळी खालिद साब इमरान शेख आबासाहेब पाटील शैलेश पाटील सौरव अवचारे नितीन रणीत सामाजिक न्यायाचे तालुका उपाध्यक्ष दिलीप सोनवणे, अमोल पाटील श्याम साळवे आदिसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार