पाचोरा :- सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.इयत्ता सहावीत शिकणाऱ्या मुलाने शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथे घडलीय. ऋषीकेश संतोष आवारे असे मृत मुलाचे नाव असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमकी घटना ?
ऋषीकेश संतोष आवारे याचे आई- वडील आणि मोठा भाऊ कापूस वेचणीच्या कामानिमित्त दुसऱ्याच्या शेतावर गेलेले होते. ऋषीकेश हा निम्म्या वाट्याने केलेल्या दुसऱ्याच्या शेतावर शेळ्या आणि बैल चारण्यासाठी गेलेला होता. संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान शेळ्या घरी आणून बांधून ठेवल्या. नंतर शेतात कोणालाच न सांगता निघून गेला. सात वाजेच्या दरम्यान वडिलांनी गावात व गावातीलच असलेल्या मुलाच्या मामाकडे तपास केला असता तो आढळून आला नाही.
वडील संतोष लक्ष्मण आवारे व भाऊ अनिकेत हे दोघे शेतात ऋषीकेशचा शोध घेण्यासाठी गेले. यावेळी त्यांना ऋषीकेश हा झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यावेळी वडिलांनी व भावाने हंबरडा फोडला. पोलीस पाटील दत्तू पाटील यांनी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसात दूरध्वनी वरून खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र ऋषीकेशच्या वडिलांनी त्याचे मृत्यू बद्दल संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान, ऋषीकेशचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सोमवार दि. ७ रोजी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता ऋषीकेश वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम