लोणार/उध्दव आटोळे
राज्यातील विविध जिल्ह्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतच्या सदस्यपदांसह सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ डिसेंबर २०२२मतदान होणार आहे.त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागु झाली असुन २० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी आज केली.
राज्यातील ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील.नामनिर्देशन पत्राची छाननी ५ डिसेंबर २०२२ रोजी होईल नामांनी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्यात दिवशी निवडणूक चिन्हाचे वाटप होईल मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वेळेस होईल,नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल मतमोजणी २०डिसेंबर २०२२ रोजी होईल.
विविध जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या जिल्हानिहाय संख्या :
अहमदनगर २०३,अकोला २६६,अमरावती २५७,औरंगाबाद २१९,बीड ७०४,भंडारा ३६३,बुलढाणा २७९,चंद्रपूर ५९,धुळे १२८,गडचिरोली २७,गोंदिया ३४८,हिंगोली ६२,जळगाव १४०,जालना २६६,कोल्हापूर ४७५,लातूर ३५१,नागपूर २३७,नंदुरबार १२३,उस्मानाबाद १६६,पालघर ६३,परभणी १२८,पुणे २२१,रायगड २४०,रत्नागिरी २२२,सांगली ४५२,सातारा ३१९,सिंधुदुर्ग ३२५,सोलापूर १८९,ठाणे ४२,वर्धा ११३,वाशिम २८७,यवतमाळ १००,नांदेड १८१ व नाशिक १९६ असे एकूण ७७५१
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






