जळगाव : – औद्योगीक वसाहत परिसरातील सुप्रिम कॉलनी पोलिस कॉलनी भागातील राहणाऱ्या नवरा बायकोच्या वादात सासूने हस्तक्षेप केल्याच्या रागातून जावयाने सासूच्या डोक्यात वीट मारत जखमी केले.याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुप्रिम कॉलनी येथे राहत असलेल्या अनीस शरिफ भिस्ती याचे पत्नीशी भांडण झाल्यावर पत्नीने आपल्या आईला बोलावून घेतले. त्यानंतर ती आईसोबत माहेरी निघून गेली.
बायको माहेरी निघून गेल्याचा राग आल्याने नवऱ्याने सासरी जात बायकोला जाब विचारला असता त्यांच्या पुन्हा वाद झाला व त्याने बायकोला मारहाण केली.यावेळी सासू ज्योती ठाकूर यांनी या वादात हस्तक्षेप केल्याने याचा राग आल्याने अनीस याने जमिनीवर पडलेली वीट ज्योती ठाकूर यांच्या डोक्यात मारत जखमी केले.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






