सोयगाव. गोंदेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी मंगळवारी ग्रामपंचायत च्या सभागृहात अध्यासी अधिकारी मारोती धोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.दरम्यान उपसरपंच पदासाठी गौरव बिंदवाल यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने गौरव बिंदवाल यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी मारोती धोंडकर यांनी केली त्यामुळे सोयगाव तालुक्यात उद्धव ठाकरे शिवसेनेचे गौरव अरविंद बिंदवाल यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याने सत्तातारांनंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे हे सोयगाव तालुक्यातील पाहिले यश प्राप्त झाले आहे.
यावेळी सहायक म्हणून ग्रामसेवक श्रीकांत पाटील यांनी निवड प्रक्रियेचे कामकाज केले सभागृहात तेरा पैकी अकरा सदस्य उपस्थित होते,निवड होताच गोंदेगाव ला जल्लोष करण्यात आला.यावेळी तलाठी .व्ही आर..चादे,.ग्रामसेवक श्रीकांत पाटील ..सरपंच वनमाला शरद निकम,उपसरपंच दीपक आहिरे. अतुल बोरसे,हिम्मत कोळी,मंगलाबई आहीरे, पल्लवी चौधरी,ज्योती नगरे,मनीषा ढाकरे,रेखा पवार, छाया सूर्यवंशी, सर्वानुमते गौरव अरविंद तेली यांची बिनविरोध उपसरपंच निवड करण्यात आली

छायाचित्र-,उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्यावर सरपंच वनमाला निकम,व इतर
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






