जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
व्यावसायिक क्षेत्रात उत्तम काळ. मनात चांगले विचार घोळत राहतील. दिनक्रम व्यस्त राहू शकेल. कोणत्याही वादापासून दूर राहावे. करियर मध्ये प्रगती करता येईल.
वृषभ :-
प्रवासाचे योग येतील. आहाराची पथ्ये पाळा. नवीन ओळख लाभदायक ठरेल. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर घरात चर्चा होईल. जोडीदाराची प्रगती होईल.
मिथुन :-
नवीन व्यवसायासाठी सुसंधी सापडेल. नोकरदार वर्गाने कामाकडे विशेष लक्ष द्यावे. पराक्रमात वृद्धी होऊ शकेल. हित शत्रूंपासून सावध राहावे. आरोग्यात सुधारणा होईल.
कर्क :-
व्यावसायिक क्षेत्रात चलती दिसून येईल. मध्यम फलदायी दिवस. भविष्यातील योजनांवर काम करणे आवश्यक. मित्रांसोबत काळ व्यतीत कराल. फाजील आत्मविश्वास टाळावा.
सिंह :-
नवीन कामासाठी प्रवृत्त व्हाल. दुसर्यांच्या मदतीला धावून जाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. हातातील कलेला योग्य दाद मिळेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल..
कन्या :-
व्यसनांना वेळीच आवर घाला. पैशाची उधळपट्टी होत नाही ना याची काळजी घ्या. उत्साहवर्धक दिवस असेल. बोलण्यातील माधुर्य जपाल. गायक मंडळींना चांगली प्रतिष्ठा लाभेल.
तूळ :-
सर्वांना गोडीने आपलेसे कराल. मित्रांशी पुन्हा नव्याने संबंध जुळतील. जोडीदाराशी नाते अधिक दृढ होईल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. आर्थिक पातळीवर दिवस चांगला जाईल.
वृश्चिक :-
जुनी उधारी वसूल होईल. दिवस चांगला जाईल. जवळचा प्रवास घडेल. व्यवसाय वाढीचे प्रयत्न यशस्वी होऊ लागतील. एखाद्या कामाला खीळ बसू शकते.
धनू :-
सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. मनाप्रमाणे खरेदी करता येईल. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. अनावश्यक खर्च वाढू शकतो. कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी.
मकर :-
आवश्यक असेल तरच आपले मत मांडावे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. कामात जोडीदाराची साथ मिळेल. प्रवासात घाई करून चालणार नाही. आपल्या साठी काही वेळ राखून ठेवावा.
कुंभ :-
मानसिक संतुलन राखावे. नवीन कामात तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. खर्चाचा पूर्ण अंदाज बांधावा. हातातील प्रकल्प पूर्णत्वास जाईल. चिकाटी सोडू नका.
मीन :-
घरात धार्मिक कार्य घडेल. प्रगतीचे नवे दार खुले होईल. भावंडांसोबत नातेसंबंध सुधारतील. व्यवसायात प्रतिष्ठा वाढीस लागेल. नव्या योजनेत गुंतवणूक कराल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






