अरेरे ! वाजत गाजत आणलेली 21 लाखाची दुचाकी पंधरा मिनिटात जळून खाक , १७व्या दिवशी सगळंच उद्ध्वस्त झालं, पहा फोटो.

Spread the love

कोल्हापूर :- कळंबा रोडवरील जनाई दत्तनगरमधील राजेश चौगुले या युवकाने काही दिवसांपूर्वी २१ लाख रुपये किमतीची स्पोर्ट्स बाईक खरेदी केली होती. शुक्रवारी पहाटे जळून ही बाईक खाक झाली. या बाईकसोबत येथील चार चाकी ही जळून खाक झाली आहे. आगीमध्ये दोन्ही वाहनं पूर्णतः जळून खाक झाल्याने चौगुले यांचं जवळपास ४० लाख रुपयांचे नुकसान झालं आहे. या आगीचे कारण अद्याप समजू शकलं नाही.

कळंबा येथील राजेश चौगुले या युवकाने गेल्या महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक किमतीची दुचाकी खरेदी केली. या आनंदाने त्याने दुचाकीची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूकही काढली. त्यामुळे गाडीची चर्चा जिल्हात रंगली. मात्र राजेश चौगुले याचा हा आनंद काही दिवसांचा ठरला. कारण आज पहाटे ही गाडी जळून खाक झाली. सोबत शेजारी असलेली चारचाकी गाडीदेखील जळून खाक झाली आहे.

दरम्यान, या वाहनांना आग कशी लागली? की जाणून बुजून ही आग लावली? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत चौगुले यांनी फिर्याद दिली असून पोलीस त्याचा तपास करत आहेत.

२१ लाखांची बाईक जळून खाक


राजेश चौगुले यांनी २१ लाखांची बाईक खरेदी केल्यानंतर परिसरातून वाजत गाजत मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीची चर्चा संपूर्ण कोल्हापुरात रंगली होती, पण महिन्याभरातच गाडी अचानक पेट घेत जळून खाक झाली आहे.

कावासाकी निंजा झेडएक्स १० आर


करवीर पोलिसांकडून आता तपास सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूरातील कळंबा येथे राहणाऱ्या राजेशने कावासाकी निंजा झेडएक्स १० आर ही गाडी खरेदी केली होती.

वाजत गाजत मिरवणूक
गाडीची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूकही काढली होती.

पश्चिम महाराष्ट्रात पहिलीच गाडी
पश्चिम महाराष्ट्रात इतकी महागडी पहिलीच गाडी असल्याने तिचं जंगी स्वागत केलं होतं.

शेअर मार्केटचा व्यवसाय
राजेश चौगले हा शेअर मार्केटिंगचा व्यवसाय करतो. त्याला गाड्यांची प्रचंड आवड आहे.

दिवाळीच्या पाडव्या खरेदी केलेली गाडी
त्याच्याकडे याआधीही बुलेट तसंच इतर स्पोर्ट्स बाईक आणि कार आहेत. मात्र यावर्षी त्याने दिवाळीच्या पाडव्याला तब्बल २१ लाखांची बाईक खरेदी

कोल्हापुरात जोरदार चर्चा
या गाडीच्या स्वागताची कोल्हापूरात जोरदार चर्चा झाली होती.

गाडी जळून खाक
गाडी खरेदी केल्यानंतर आता १७ दिवसांमध्येच जळून खाक झाली आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार