लोकसहभागातून अंजनी नदी स्वच्छता चळवळ.

Spread the love


एरंडोल :-शहरातील सर्व नागरीक ,सर्व शासकीय कार्यालये, अधिकारी, कर्मचारी,पत्रकार बांधव, शिक्षक वृंद,सामाजिक मंडळ,तालीम मंडळे,सामाजिक कार्यकर्ते,एनजीओ यांना याव्दारे आवाहन करण्यात येते की एरंडोल नगर पालिकेतर्फे लोकसहभागातून अंजनी नदी स्वच्छता तसेच श्रमदानातून स्वच्छता व नदी काठावर वृक्ष लागवड मोहीम

दि.23 जाने ( पराक्रम दिन) ते 26 जाने (प्रजासत्ताक दिन ) 2022 सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत चार दिवस आयोजित करण्यात आली आहे.तरी आपण आपल्या शहराच्या शाश्वत विकासासाठी आपल्याला शक्य असेल त्या प्रमाणात कोविड 19 अनुषंगिक नियमांचे पालन करून सहभाग नोंदवावा.

श्रमदानासाठी शक्य असल्यास आवश्यक असलेले साहित्य सोबत घेऊन यावे. एरंडोल शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे.तसेच सदर msg आपल्याकडील सर्व व्हॉट्स ॲप ग्रुप वर शेयर करावे.

ही विनंती विकास नवाळे मुख्याधिकारी तथा प्रशासक एरंडोल नगर पालिका.

टीम झुंजार