4 Food Items to Keep Liver Healthy Diet Tips : आहाराबाबत योग्य ती काळजी घेतल्यास आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.
Highlights
- अंजली मुखर्जी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून नेहमी काही ना काही उपयुक्त माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करत असतात.
- लिव्हर वेळच्या वेळी डीटॉक्स केले तर तिचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
लिव्हर म्हणजेच यकृत हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. शरीरात जमा होणारे अनावश्यक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी लिव्हर अतिशय महत्त्वाचे काम करत असते. आपण कधी करीयरच्या नादात तर कधी मज्जा मस्ती करण्याच्या नादात शरीराकडे पुरेसे लक्ष देत नाही. मात्र एक वेळ अशी येते की काही ना काही कारणाने आपल्याला शारीरिक तक्रारी उद्भवतात आणि मग काही गोष्टी आपल्या हातात न राहता डॉक्टरांवर सोपवाव्या लागतात. मात्र सुरुवातीपासून आरोग्याकडे योग्य पद्धतीने लक्ष दिले तर आपल्यावर अशी वेळ येत नाही.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीविषयक चुकीच्या पद्धतींमुळे लिव्हरशी संबंधित आजारांच्या प्रमाणात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लिव्हरच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरु शकते. यकृताचा आजार कधी अनुवांशिक असतो तर कधी मद्यपान,लठ्ठपणा यांमुळेही यकृताच्या कामात बिघाड होतो. यकृत निकामी झाल्यामुळे शरीरात अशक्तपणा येणे, भूक न लागणे, उलट्या होणे, झोप न लागणे, दिवसभर थकवा जाणवणे, शरीरातील सुस्ती, वजन झपाट्याने कमी होणे, यकृताला सूज येणे ही लक्षणे दिसू लागतात. आहाराबाबत योग्य ती काळजी घेतल्यास आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.
प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी आहारात कोणत्या ४ गोष्टींचा समावेश केल्यास यकृताचे कार्य चांगले राहू शकते याविषयी सांगितले आहे. लिव्हर योग्य पद्धतीने डीटॉक्स झाली तर तिचे कार्य चांगले राहण्यास मदत होते. अंजली मुखर्जी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून नेहमी काही ना काही उपयुक्त माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करत असतात. आता लिव्हर डीटॉक्स करण्यासाठी गाजर, बीट आणि टोमॅटोपासून ज्यूस कसा करायचा हेही त्या सांगतात. इतकेच नाही तर लसूण आणि लिंबाचे शरीराला हाणारे फायदेही सांगतात. त्यामुळे लिव्हरसाठी आहारात कोणत्या गोष्टी आवर्जून घ्यायला हव्यात याविषयी…
१. गाजर
२. बीट
३. लसूण
४. लिंबू.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






