सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. तिनं कोणाला मदतीसाठी बोलावू नये म्हणून तिचा मोबाईल फोनही फोडला. मुलींच्या या भांडणामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
दारूच्या नशेत भांडणं करणारी अनेक मुलं तुम्ही पाहिली असतील. अनेकदा असे व्हिडीओ इंटरनेटवर देखील व्हायरल होतात. पण आता मुली देखील काही कमी नाही. होय, दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या ४ मुलींचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. इंदूरमधील LIG तिराहे या ठिकाणी ही घटना घडली. या ठिकाणी ४ मुलींनी एका मुलीला बेदम मारहाण केली. एवढंच नव्हे तर तिनं कोणाला मदतीसाठी बोलावू नये म्हणून तिचा मोबाईल फोनही फोडला. मुलींच्या या भांडणामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, पट्ट्यानं मारलं
या भांडणाचं नेमकं कारण काय? याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण चार मुलींचा एक ग्रुप स्कूटीवर बसून आला. त्यांनी एका मुलीला घेरलं आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. अक्षरश: तिच्यावर लाथा बुक्क्यांची बरसात केली. या चारही मुली दारूच्या नशेत होत्या. त्या अश्लील शिव्या देखील घालत होत्या. ही संपूर्ण घटना तेथील उपस्थित लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि आता हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय.
दारूच्या नशेत मुलींची हाणामारी पहा व्हिडिओ:
पोलीस करतायेत तपास :
तेथील उपस्थित लोकांपैकी काही जण मध्ये पडले अन् मार खाणाऱ्या मुलीला त्यांनी वाचवलं अन्यथा तिचं काही खरं नव्हतं. ती मुलही अक्षरश: रस्त्यावर बेशुद्ध पडली होती. या प्रकरणी अद्याप कुठलीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही. पण तरी देखील पोलीस मात्र या घटनेचा तपास करत आहेत. व्हायरल व्हिडीओच्या मदतीनं आरोपी तरुणींचा शोध सुरू आहे. जेव्हा या मुली पकडल्या जातील आता तेव्हाच कळेल या मारहाणीमागचं मुख्य कारण.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






