कासोदा ता.एरंडोल: येथील ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेत गेल्या दिड ते दोन वर्षापासून येथील व्यापारी कैलास अग्रवाल यांनी लहान बालकांच्या अंगणवाडी शेजारी व्यावसायिक गाळा बांधून व्अंगणवाडीच्या इमारतीला लहान बालकांना येणारी शुद्ध हवा, सूर्य प्रकाश सारखे नैसर्गिक वायू येणे बंद केले होते.यामुळे लहान बालकांच्या आरोग्यावर फार मोठा परिणाम होणार होता.
असे चौकशी अधिकारी रविंद्र सपकाळे यांनी आपल्या चौकशी अहवालात स्पष्ट नमुद केले होते. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सदर अतिक्रमण काढणे बाबत सर्वानुमते ठराव ही पारीत करण्यात होते.
परंतु सदर अतिक्रमण हे ग्रामपंचायतीत प्रशासकीय कार्यकाळात झाल्याने ग्रामपंचायतचे सदस्य अतिक्रमण काढण्याचा ठराव करीत होते पण तत्कालीन ग्रा.वि.अधिकारी चालढकल करित होते.
पंरतु नविन आलेले ग्रा.वि.अधिकारी चव्हाण यांनी दोन नोटीसा दिल्या नंतर संबंधित अतिक्रमण धारकाने अतिक्रमण काढताना आज पर्यत बांधलेल्या अतिक्रमणातील छतावरील पत्रे व गाळा बंद करण्यासाठी वापरलेले शटर ह्या वस्तू काढल्या आहेत उर्वरीत भिंती तश्याच उभ्या आहेत.त्या कधी निघणार यांची प्रतिक्षा गावकऱ्यांना आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






