अरे बापरे….: प्रेयसीचे ३५ तुकडे केले, फ्रिजमध्ये लपवले; दुर्गंधी येऊ नये म्हणून फ्लॅटमध्ये अगरबत्त्या लावल्या; पण….

Spread the love

नवी दिल्ली : – सध्या देशात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच दिल्लीत एका धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रद्धा विकास वॉकर खून प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. आरोपी लिव्ह इन-पार्टनर अफ्ताब अमीन पुनावालानं मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी स्थानिक बाजारात असलेल्या तिलक इलेक्ट्रॉनिक्समधून ३०० लीटरचा फ्रिज खरेदी केला होता. त्यातच त्यानं श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवले.

श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अफ्ताबनं मृतदेहाचे तुकडे केले. तो राज रात्री रात्री २ वाजता फ्लॅटमधून निघायचा आणि मृतदेहाचा एक तुकडा जंगलात फेकून परत यायचा. जवळपास १६ दिवस त्यानं तुकडे फेकले. आरोपीनं शेफचं प्रशिक्षण घेतलं गोतं. त्यामुळे त्याला एखाद्या वस्तूचे तुकडे कसे करतात याची कल्पना होती.

श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकून अफ्ताब सामान्यपणे जगत होता. त्यामुळे त्याच्यावर कोणालाही संशय आला नाही. ज्या खोलीत श्रद्धाची हत्या केली, त्याच खोलीत अफ्ताब राहायचा. हत्याकांडानंतर तो झोमॅटोवरून जेवण मागवायचा. अफ्ताबला श्रद्धाच्या हत्येबद्दल कोणताही खेद नाही.

घरात प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे ठेऊन अफ्ताब अतिशय शांतपणे जगत होता. श्रद्धाचा खून झाल्याचं आसपास असलेल्या कोणालाही समजलं नाही. बाहेर दुर्गंध पसरू नये म्हणून अफ्ताबनं फ्लॅटमध्ये अगरबत्ता लावल्या. या प्रकरणात पोलिसांनी डिजिटल रेकॉर्ड आणि इलेक्ट्रॉनिक फूट प्रिंट तपासले. त्यामुळे पोलिसांना आरोपीविरोधात पुरेसे पुरावे सापडले.

श्रद्धा आणि अफ्ताब यांच्या प्रेम संबंधांना कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी मुंबई सोडली आणि दिल्लीला आले. ८ मे रोजी त्यांनी दिल्ली गाठली. एक रात्र ते पहाडगंड हॉटेलात थांबले. त्यानंतर सैजदुल्लाजाब हॉस्टेलवर थांबले. सगळी लोकेशन त्यांनी गुगलवर शोधली होती.

एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असताना श्रद्धा आणि अफ्ताबची ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र त्याला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघे दिल्लीला गेले. श्रद्धा अफ्ताबकडे लग्नाचा आग्रह धरत होती. याच मागणीला कंटाळून अफ्ताबनं श्रद्धाला संपवलं. बरेच दिवस श्रद्धाबद्दल काही माहिती न मिळाल्यानं तिच्या वडिलांना संशय आला. त्यांनी श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी अफ्ताबचं लोकेशन ट्रॅक केलं. त्याच्याविरोधात पुरावे गोळा केले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार