जळगाव :- महिलांवर होणारे अत्याचार काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. अशातच जळगाव शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेला दुकानावर बोलवून तिच्याकडे शरीर सुखाचे मागणी करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकी काय आहे घटना?
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की मेहरून परिसरातील एका भागात 48 वर्षीय महिला वास्तव्यास आहे. याच परिसरात राहणार्या एकाने 13 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता महिलेला एका दुकानावर बोलवून तिच्याकडे शरीर सुखाचे मागणी केली. व महिलेचा विनयभंग केला.
या प्रकाराबाबत महिलेने सायंकाळी पुणे सहा वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस तक्रार दिली त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे करीत आहे
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






