VIDEO : रिक्षाचालकाच्या अश्लील चाळेला घाबरून मुलीने घेतली धावत्या रिक्षेतून उडी, पहा घटनेचा धक्कादायक व्हिडिओ

Spread the love

औरंगाबाद : – सध्या महाराष्ट्रात महिलांना त्रास देण्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच औरंगाबाद शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलगी रिक्षात एकटी असल्याचे फायदा उचलून रिक्षा चालकाने अश्लील प्रश्न विचारण्यास आणि अश्लील चाळे करण्यात सुरुवात केल्यामुळे घाबरलेल्या मुलीने धावत्या रिक्षातून थेट उडी मारलीय. या घटनेत मुलगी रस्त्यावर कोसळली आणि गंभीर जखमी झाली. यानंतर रिक्षा चालकाने मुलीची मदत करण्याऐवजी ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही (CCTV Video) कैद झालीय.

या प्रकरणात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणारा रिक्षाचालक सय्यद अकबर सय्यद हमीद (वय ३९, रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) याला क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेतले.

पहा व्हिडिओ :

https://twitter.com/ssidsawant/status/1592709491799523328?t=v6aOnHbLK4bdFcmDcVPlOw&s=19

याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लास करणारी एक अल्पवयीन (१७ वर्षीय) मुलगी गोपाल टी ते शिवाजी हायस्कूल येथे जाण्यासाठी रिक्षात बसली. रिक्षात ती एकटी असल्याची संधी साधून रिक्षाचालकाने तिच्याशी अश्लील संवाद सुरू केला आणि रिक्षा वेगात नेण्यास सुरुवात केली. मात्र, मुलीने प्रसंगावधान राखून रिक्षातून बाहेर उडी घेतली.

धावत्या रिक्षातून उडी टाकल्यानं मुलीच्या डोक्याला गंभीर मार लागला. ज्या वेळी मुलीने रिक्षातून उडी टाकली, तेव्हा रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. मागून येणाऱ्या वाहनांना आणि दुचाकीखाली ही मुलगी येण्याची भीती होती. मात्र मागील वाहनांनी प्रसंगावधान राखल्यानं थोडक्यात मोठा अनर्थ टळला.

8 दिवसांपूर्वी त्याच रिक्षाने घरी गेले होते

पीडितेने सांगितले की, ‘उस्मानपुऱ्यात माझा क्लास आहे. वडील किंवा भाऊ मला राेज सोडवायला यायचे. रविवारी सकाळी सात वाजता पप्पांनीच सोडले. मात्र, काम असल्याने ते घ्यायला आले नाहीत. त्यामुळे मी रिक्षाने जाणार होते. क्लासपासून चालत गोपाल टी सेंटरपर्यंत गेले. तिथे एक रिक्षा माझ्यासमाेर येऊन उभी राहिली. आठ दिवसांपूर्वीच मी त्याच रिक्षाने घरी गेले होते, सोबत सहप्रवासी महिलाही होती. आम्ही दोघीही आपापल्या स्टॉपवर उतरलो. म्हणून रविवारीही मी फार विचार न करता त्या ऑटोत बसले. तेव्हा मात्र चालकाने इतर कुणीही प्रवासी घेण्यासाठी रिक्षा थांबवली नाही. रिक्षा सुरू झाल्यावर माझ्याशी तो गप्पा मारू लागला. ‘कोणत्या क्लासमध्ये जातेस ? कुठे राहतेस’ असे प्रश्न विचारू लागला. वडिलांच्या वयाचा माणूस होता, म्हणून मीही नॉर्मलपणे काही प्रश्नांची उत्तरे देत होते. पण मध्येच त्याच्यातील विकृतपणा दिसू लागला.

मग सुटका नाही, असे विचार मनात आले

पीडितेने सांगितले की, ‘कुणासोबत फिरायला जायला आवडते का?’ असे विचारून आणखीही अश्लील काही प्रश्न विचारू लागला. मला एकदमच धडकी भरली. त्याच्या नियतीत खोट दिसून आली. मी त्याच्याशी बोलणे बंद केले. काय करावे सुचेना. त्याला विराेध केला किंवा काही बोलले तर तो आपल्याला पळवेल किंवा रिक्षा दामटील. मग सुटका होणार नाही असे अनेक विचार मनात येत होते. त्याच्या धास्तीने बॅगमधून मोबाइलही काढता येईना. मला समोर संकट दिसत होते. छातीत धडधड व्हायला लागली, अंग थरथरत होते. त्यामुळे क्षणाचाही विचार न करता मी सीटच्या एका कोपऱ्यावर सरकून काहीच विचार न करता सरळ रस्त्यावर उडी मारली. त्यानंतर डोळ्यांपुढे अंधारच होता. कुणीतरी तोंडावर पाणी शिंपडले तेव्हा शुद्ध आली, डोळे उघडले तेव्हा काही जण मला रिक्षातून रुग्णालयात नेत असल्याची जाणीव झाली.’

30 तास प्रकृती नाजूक

घटनेनंतर नेहाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 30 तास तिची प्रकृती नाजूक होती. मंगळवारी थोडीशी सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून आरोपी सय्यद अकबरला अटक केली. सोमवारी दुपारीपर्यंत तिची प्रकृती नाजुक असल्याने नेमकी घटना स्पष्ट नव्हती. त्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. रिक्षातून नेहा पडतानाचे फुटेज पाहिल्यानंतर क्रांती चौक पोलिसही हादरून गेले. गांभीर्य ओळखून निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी तत्काळ पथके रवाना करत रिक्षाचालकाचा शोध घेण्याचे आदेश दिले. उपनिरीक्षक विकास खटके, अमोल सोनवणे, महादेव गायकवाड, मोहंमद एजाज शेख यांनी तपास सुरू केेला. गोपाल टी ते सिल्लेखाना व पुढे तब्बल ३५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात रिक्षाचा १५६२ क्रमांक कैद झालेला. मात्र, सिरीज अस्पष्ट होती. त्यामुळे आरटीओककडून माहिती घेत त्या क्रमांकाचे नऊ रिक्षाचालक ताब्यात घेतले. अखेर सय्यद अकबर हा आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. अंमलदार संतोष मुदिराज, इरफान खान, नरेंद्र गुज्जर, संतोष सुर्यवंशी, भावलाल चव्हाण, हनुमंत चाळणेवाड, शेख मुश्ताक, सज्जन जोनवाल यांनी कारवाई पार पाडली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार