संजय राऊत म्हणतात, “वीर सावरकरांचा विषय काढण्याचं काही कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच…!”
मुंबई : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यांनतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधी यांच्या या टीकेनंतर भाजप आक्रमक झाली आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया देत थेट इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात येऊन सावरकरांची बदनामी करणं हे आम्हाला आणि काँग्रेसलाही मंजूर नाही. इथे येऊन सावरकरांवर बोलण्याची काही गरजच नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते. हे मी तुम्हाला सांगतो, असा इशारा देतानाच सावरकर हे आमचं श्रद्धाचं स्थान आहे, असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला संपूर्ण देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात या यात्रेला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. खरं तर भारत जोडो यात्रा महागाई, बेरोजगारीपासून हुकूमशाहीच्या मुद्द्यावर सुरू असताना वीर सावरकर यांचा विषय काढण्याची गरज नव्हती. सावरकरांचा विषय काढल्याने फक्त शिवसेनाच नव्हे तर महाराष्ट्र काँग्रेसलाही धक्का बसला आहे असं राऊत म्हणाले. सावरकरांमुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते असा इशाराही त्यांनी दिला.
पहा व्हिडिओ :
काय म्हणाले राहुल गांधी ?
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून दोन दिवसांपूर्वी हिंगोलीमध्ये यात्रेतील सभेत बोलताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आपली भूमिका मांडली. सावरकर हे ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते आणि त्यांनी तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटिशांची माफीही मागितली होती, असा दावा राहुल गांधींनी केला आहे. याच्या समर्थनार्थ राहुल गांधींनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सावरकरांचं एक पत्रही दाखवलं. त्यामुळे या मुद्द्यावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
“राहुल गांधींनी मध्येच वीर सावरकरांचा मुद्दा आणण्याची गरज नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीतही फूट पडू शकते. मी तुम्हाला सांगून ठेवतोय. कारण वीर सावरकर हे नेहमीच आमचे श्रद्धास्थान राहिले आहेत आणि नेहमी राहतील”, असं संजय राऊत म्हणाले.”काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितलंय की वीर सावरकरांची कोणत्याही प्रकारे बदनामी, चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना ते सहन करणार नाही. हे सांगितल्यावर आमचा विषय संपतो”, असंही ते म्हणाले.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.