हृदयद्रावक घटना : 10 महिन्याची चिमुकली गरम पाण्याजवळ गेली अन् अनर्थ घडला

Spread the love

नाशिक : – नाशिकमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आलीय. येथे बाथरुममध्ये काढून ठेवलेलं गरम पाणी दहा महिन्यांच्या चिमुकलीवर सांडलं आणि त्यात ती प्रचंड होरपळली. नाशिक येथील गंगापूर नाका भागामधील ही घटना असून यामध्ये गंभीररीत्या भाजलेल्या चिमुकलीवर गेले तीन दिवस उपचार सुरु होते. पण तिची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरलीय. या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्काच बसलाय.

नेमकी काय हे घटना ?

आवेरा शुभम इंगळे असं या दहा महिन्यांच्या चिमुकलीचे नाव आहे. आवेराच्या जन्माने इंगळे कुटुंबात आनंद संचारला होता. चिमुकल्या आवेराने घरात किलबिलाट झाला होता. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. आवेरा इंगळे या चिमुकलीच्या अंघोळीसाठी पाणी गरम करण्यात आलं होतं.

हे अंघोळीसाठीचं कडकडीत गरम पाणी बाथरुममध्ये काढून ठेवलं गेलेलं. पण याच गरम पाण्याने आवेराचा घात गेला.आवेरा अंगावर गरम पाणी सांडल्यामुळे प्रचंड भाजली गेली. तिचं कोवळं शरीर गंभीररीत्या जखमी झालं. तिच्या रडण्याच्या आवाजाने घडलेला प्रसंग लगेचच कुटुंबीयांच्या लक्षात आला.

इंगळे कुटुंबीयांनी आवेराला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरु होते. आवेराचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्नांची शर्थ केली जात होती. दरम्यान, मृत्यूशी सुरु असलेली आवेराची झुंज अधिकच कठीण होत गेली होती. तीन दिवस दहा महिन्यांची आवेरा मृत्यूशी झुंजली. पण तिची झुंज अखेर अपयशी ठरली. मंगळवारी तिने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार