Soaked Chana Benefits: रोज एक वाटी भिजलेले चणे खाल्ले तर अनेक फायदे मिळू शकतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले चणे खाल्ल्याने काय फायदे होतात.
Soaked Chana Benefits: हिवाळ्यात भिजलेले चणे खाणं फार फायदेशीर ठरतात. काळे चणे जास्तीत जास्त लोक खातात. तेच काही लोक चणे रोस्ट करून खाणं पसंत करतात. तर काही लोक उकडून चणे खातात. पण चणे भिजवूनही खाल्ले जाऊ शकतात. भिजलेले चणे खाणं आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. कारण चण्यांमध्ये प्रोटीन, फायबर, एनर्जी, आयरन, कॅल्शिअम आणि सोडिअमसारखे पोषक तत्व असतात. त्यामुळे रोज एक वाटी भिजलेले चणे खाल्ले तर अनेक फायदे मिळू शकतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले चणे खाल्ल्याने काय फायदे होतात.

खाण्याची योग्य पद्धत :
मूठभर चणे घेऊन ते आधी स्वच्छ करून घ्यावे. रात्री त्याला भिजत ठेवावे. सकाळी ते चणे चावून चावून खावे. जर आवडत असल्यास चण्याचे पाणी देखील गाळून त्या पाण्याचे सेवन करू शकता.
पचनक्रिया सुधारते
पचनक्रिया मजबूत करण्यासाठी तुम्ही भिजवलेले चणे खाऊ शकता. चण्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. फायबर आतड्या आणि पोटातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत करतं. याने आपलं शरीर डिटॉक्स होतं आणि पोटासंबंधी समस्या दूर होतात.
हार्ट हेल्थसाठी
भिजवलेले चणे खाल्ल्याने तुमचं हृदयही निरोगी राहतं. असं होतं कारण चण्यांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि एंथोसायनिनि आढळतात. हे सगळे तत्व हृदय आणि रक्त वाहिका निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याशिवाय चण्यातील पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमही हृदयासाठी फायदेशीर असतात.
वजन करा कमी
हिवाळा कमी करण्यासाठी सगळ्याच चांगला मानला जातो. तुम्हालाही जर वजन कमी करायची असेल तर रोज रिकाम्या पोटी भिजवलेल्या चण्यांचं सेवन करा. चण्यामध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे रोज सकाळी भिजवलेले चणे खावे. याने तुमचं पोट जास्त वेळ भरून राहतं. याने तुम्ही ओव्हरइटिंगपासून वाचाल आणि तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहणार. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रोज नाश्त्यात भिजवलेले चणे खा.
दररोज सकाळी भिजलेले चणे खाण्याचे फायदे :-
- 1. शक्ती आणि ऊर्जा – नियमित भिजलेले चणे खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो.
- 2. कब्जा पासून बचाव – भरपूर फायबर असल्याने पोट स्वच्छ होतो आणि पचन चांगले होते.
- 3. स्पर्म संख्या वाढते – सकाळी 1 चमचे साखरेसह ते खाण्याने स्पर्म काउंट वाढतो.
- 4. फर्टिलिटी वाढते – दररोज सकाळी मूठभर भिजलेले चणे मधासोबत खाल्ल्याने फर्टिलिटी वाढते.
- 5. मूत्र समस्या – भिजलेले चणे गुळासोबत खाल्ल्याने वारंवार युरीन जाण्याची समस्या दूर होते. पाईल्सचा त्रास देखील कमी होण्यास मदत होतो.
- 6. निरोगी त्वचा राहते, वजन वाढण्यास मदत मिळेल, सर्दी खोकल्यापासून रक्षण होते, किडनीचा त्रास नाहीसा होतो तसेच हार्ट निरोगी राहत.
- 7 . भिजलेले चणे खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते
- 8. रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत मिळते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






