Bank Robbery Video: शिक्षेला न घाबरता एका व्यक्तीनं केवळ ६० सेकंदात बँकेत दरोडा टाकलाय. बँक दरोड्याचा हा LIVE व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय.
चोरी करणं हा गुन्हा आहे. पण तरी देखील काही मंडळी झटपट पैसा कमवण्याच्या उद्देशानं चोरी करताना दिसतात. बरं चोरी करणं देखील काही सोपं काम नाही. त्यासाठी व्यवस्थित नियोजन करावं लागतं. कारण जर एखादा चोरी करताना पकडला गेला. तर मग त्याची काही खैर नाही. त्याला पोलीस तर शिक्षा करतातच पण सुरुवातीला पब्लिक धुलाई सुद्धा होते. मात्र या शिक्षेला न घाबरता एका व्यक्तीनं केवळ ६० सेकंदात बँकेत दरोडा टाकलाय. होय, आश्चर्यचकित झालात ना. केवळ ६० सेकंदात हा व्यक्ती बँकेतले पैसे घेऊन फरार झाला. बँक दरोड्याचा हा LIVE व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय.
दरोडा पाहून पोलीसही हादरले

ही धक्कदायक घटना राजस्थानमधील पाली जिल्ह्यात घडली आहे. दोन दरोडेखोरांनी जाडन गावातील SBI बँकेत दरोडा टाकलाय. आश्चर्याची बाब म्हणजे हे चोर बंदूक घेऊन आले अन् केवळ ६० सेकंदात पैसे घेऊन पसार झाले. त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना प्रतिकार करण्याची सुद्धा संधी दिली नाही. ही संपूर्ण घटना बँकेच्या CCTV कॅमेऱ्यात केद झाली असून आता हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
राजस्थानमध्ये केवळ ६० सेकंदात लुटली बँक
दरोडेखोरांनी किती पैसे पळवले

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की दरोडेखोर सकाळच्या वेळी बँकेत शिरले. त्यावेळी बँकेत केवळ ५ कर्मचारी होते. दरम्यान त्यांनी हवेत गोळीबार करून कर्मचाऱ्यांना घाबरवलं. आणि ३ लाख रुपये घेऊन पसार झाले. पोलीस या दरोड्याचा तपास करत आहेत. गुन्हेगारांची हेल्मेट घातलं होतं त्यामुळे त्यांची ओळख पटवणं कठीण जात आहे. मात्र तरी देखील ते दरोडेखोरांना लवकरात लवकर शोधून काढतील अस् आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






