‘जशाच तसे’ उत्तर मिळणार ;ॲड. शरद माळी
धरणगाव : – राज्यात सध्या महासभांचा धडाका सुरू झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस, शिवसेना, भाजप, आणि राष्ट्रवादी पक्ष ही भव्य सभा घेत आहे. अश्याच प्रकारे दि.१८, शुक्रवार रोजी धरणगाव शहरात ना.गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना (शिंदेगट) तर्फे कार्यकर्त्यांना बुस्टर देण्यासाठी तसेच शिवसेना आणि महाविकास आघाडीला डोस देण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटलांनी नेहमीप्रमाणे आपल्या खास ठाकरी शैलीतील तडाखेबंद भाषणात विरोधकांवर ठीका केली होती. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका आहेतच, तर त्या निवडणुकांच्या आखाड्यात सर्वांना पाहणार!
त्याचप्रमाणे पालकमंत्री पाटील यांनी नाव न घेता विरोधकांवर टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज दि.२० नोव्हे, २०२२ रविवार रोजी सायंकाळी ७-०० वाजता, छ. शिवरायांच्या स्मारकजवळ शिवसेना (ठाकरे गट) पक्षाची ” करारा जवाब ” सभा आयोजित केली आहे. या सभादरम्यान अनेकजणांचा पक्षप्रवेश होणार आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या राजकीय विषयांवर भूमिका मांडण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे ही सभा आयोजित केली आहे. सभेचे वक्ते शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी असणार आहेत. सभेदरम्यान आम्ही ‘जशाच तसे’ याच भाषेत उत्तर देणार असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख ॲड. शरद माळी यांनी दिली आहे.
एकंदरीत धरणगाव व ग्रामीण भागात सर्वच पक्षांकडून बैठका, सभा, पत्रकार परिषद, पक्ष प्रवेशाचा धडाका पाहता आगामी निवडणुकांच्या तयारीचाच हा भाग असू शकतो, अशीही सद्या चर्चा आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






