सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाच्या काही नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान केला जात आहे.राज्यपाल कोश्यारी यांनी आजपर्यंतच्या केल्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘इंस्टाग्राम’वर शेअर करत केंद्र सरकारला विनंती केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये म्हटलं आहे की,राज्यपाल महोदयांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा अवमानास्पद उल्लेख करुन तमाम मराठी माणसांची मने दुखावली होती.राज्यपाल आणि राज्याची जनता यांच्यामध्ये परस्पर विश्वास व सौहार्दाचे एक नाते असणे गरजेचे आहे. पण राज्यपालांच्या वक्तव्यांमुळे ते शिल्लक राहिले नाही.म्हणून माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की, राज्यपाला महोदयांच्याबाबत निर्णय घेण्याबाबत आपण सकारात्मक विचार करावा.
राज्यपाल महोदयांकडून शिवरायांचा अवमानास्पद उल्लेख झाल्यानंतर भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी देखील अशीच मुक्ताफळे उधळली. हे सातत्याने जाणिवपूर्वक होत आहे हे आता महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येऊ लागले आहे. आम्हा मराठी माणसांसाठी शिवराय म्हणजे श्वास आहेत. त्यांचा अवमानास्पद उल्लेख आम्ही मराठी माणूस कदापि सहन करणार नाही.
एखाद्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, अभिमान आदींची किमान माहिती बाळगणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांना महाराष्ट्र व मराठी माणसांच्या भावनांची अजिबात जाणिव नाही अशीच त्यांची आजवरची वागणूक पाहता दिसते. छत्रपती शिवराय, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल सातत्याने अवमानास्पद वक्तव्ये करुन त्यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे.राज्यपाल आणि राज्याची जनता यांच्यामध्ये परस्पर विश्वास व सौहार्दाचे एक नाते असणे गरजेचे आहे. पण राज्यपालांच्या वक्तव्यांमुळे ते शिल्लक राहिले नाही.म्हणून माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की, राज्यपाला महोदयांच्याबाबत निर्णय घेण्याबाबत आपण सकारात्मक विचार करावा.
पहा व्हिडिओ :
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






