पारोळ्यात ‘स्वयंसिद्ध’च्या माध्यमातून लघुउद्योजकांना उभारी..!

Spread the love

जळगाव जनता बँकेच्या ४३ व्या वर्धापनदिनी कर्ज मंजुरी पत्राचे लाभार्थ्यांना वितरण

झुंजार वृत्तसेवा पारोळा प्रतिनिधी विशाल महाजन


पारोळा:- येथील जळगाव जनता बँकेच्या स्वयंसिद्ध या कर्जाऊ योजनेच्या माध्यमातून लघुउद्योजकांना उभारी मिळाली आहे.परिणामी आत्मनिर्भरतेच्या दिशेने सक्षमतेने उद्योजकांचा प्रवास सुरु झाला आहे. जळगाव जनता बँकेच्या मुख्य शाखेचा ४३ व्या वर्धापनदिनाच्या शुभंपर्ववर ७ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले.

‘सब समाज को लिए साथ मे आगे है बढते जाना’ या ब्रीद वाक्यनुसार जळगाव जनता बँकेच्या पारोळा शाखेने तळागाळातील सर्वसामान्यांना विविध कर्जाऊ योजनेच्या माध्यमातून आधार तर दिलाच आहे पण आत्मनिर्भरतेच्या वाटचालीसाठी सक्षमतेने आर्थिक प्रोत्साहन ही दिले आहे.परिणामी उद्योजक वाढीस हातभार लागला आहे.

लाभार्थ्यांला कर्ज मंजुरीचे पत्र देतांना सल्लागार,शाखाधिकारी,कर्ज विभाग प्रमुख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले आत्मनिर्भर भारताचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी स्वयंसिद्धच्या माध्यमातून सुरुवात झाल्याचे सकारात्मक चित्र पहावयास मिळत आहे.दरम्यान स्वयंसिद्धच्या लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीचे पत्र बँकेचे सल्लागार,
,शाखाधिकारी,कर्जविभाग प्रमुख यांच्या हस्ते देण्यात आले.

बेरोजगार बनले व्यावसायिक


जळगाव जनता बँकेच्या स्वयंसिद्ध या कर्जाऊ योजनेच्या माध्यमातून १ लाखाचे कर्ज निव्वळ ११ टक्के व्याजदराने होतकरू सक्षम नवोउद्योजकांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी अथवा व्यवसाय वृद्धीसाठी दिले जाते. याच योजनेच्या माध्यमातून कर्ज घेऊन काही बेरोजगार व्यवसायिक बनल्याचे पहावयास मिळत असून स्वयंसिद्धच्या माध्यमातून स्वप्न साकार करण्यास मोठी मदत झाल्याची भावना कर्जदारांनी ‘तरुण भारत’ कडे व्यक्त केल्या.

टीम झुंजार