विद्यार्थ्यांनी घेतले गणितीय व्यवहाराचे धडे
धरणगाव :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसई खुर्द येथे सहशालेय उपक्रमांतर्गत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. मेळाव्याचे उद्घाटन सरपंच सपना मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शाळेतील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विविध खमंग पदार्थांचे एकूण 20 स्टॉल लावले होते. याचा आस्वाद घेण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी उपस्थिती दिली.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रविंद्र पाटील,सदस्य प्रदीप गुंजाळ, कल्पना मराठे ग्रामपंचायत सदस्य सुरेश गुंजाळ, राहुल राजकर सिताराम आप्पा व ग्रामस्थ उपस्थित होते .
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक संजय गायकवाड शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी सूरमारे व वैशाली वाणी यांनी परिश्रम घेतले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






