धरणगाव :- इंदिरा गांधी कन्या विद्यालय धरणगाव येथे यु-डायस प्लस कार्यशाळा कार्य कुशल गट शिक्षण अधिकारी रवी किरण बिर्हाडे, व डायटचे प्राचार्य डॉक्टर विद्या बोरसे, इंदिरा कन्या विद्यालयाचे सचिव सी के पाटील, यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. तालुकास्तरीय कार्यशाळेत यु-डायस प्लस फॉर्म कसा भरावा याबाबत सखोल मार्गदर्शन कार्य कुशल गटशिक्षण अधिकारी रविकिरण बिऱ्हाडे, डायटचे अधिव्याख्याता डॉक्टर विद्या बोरसे, यांनी केले तसेच व्ही स्कूल ॲप डाऊनलोड करून विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग कसा करावा.
निपुन भारत अंतर्गत माता पालक गट तयार करणे. बालकांचे होणारे हंगामी स्थलांतराचे सर्वेक्षण, बालरक्षण ॲप, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेशन, फिट इंडिया मोहीम, राजश्री शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा, तंबाखू मुक्त शाळा, सेवा पुस्तक अपडेट करणे, शालेय पोषण आहार ऑडिट, आयटीएस कायद्याची माहिती, निपुन चाचणी, बाला उपक्रम, शिष्यवृत्ती परीक्षा, अप्रगत विद्यार्थ्यांचे अध्यापन, इत्यादी बाबींवर त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले कार्यशाळेत सी के पाटील, केंद्रप्रमुख, गट साधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती ,तज्ञ मार्गदर्शक, तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






